Elec-widget

राजकारणाला नवं वळण, राजकीय सन्यास घेणार का अजित पवार?

राजकारणाला नवं वळण, राजकीय सन्यास घेणार का अजित पवार?

उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार राजकीय सन्यास घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : राजकीय घडामोडींमुळे सध्या राज्यात वातावरण ढवळून निघालं आहे. या सगळ्या राजनाट्यानंतर अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सरकार स्थापन केले होते. पण त्यांनीच आता राजीनामा दिल्यामुळे आम्ही देखील राजीनामा देत आहोत असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पण आता उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार राजकीय सन्यास घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आमच्या राजकारणाची पातळी घसरली असून आता मी शेती करणार असल्याचं अजित पवार विधानसभा निवडणुकांआधी आमदारकीचा राजीनामान दिल्यानंतर बोलले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मी अस्वस्थ आहे आणि म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. आता राजकीय सन्यास घेऊन मी शेती करणार असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आमदारकीचाही राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, राजकारणातली BIG BREAKING

तर याच सगळ्यावर अजित पवारांना टार्गेट करत तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या आणि राजकीय सन्यास घ्या असा सल्ला सोशल मीडियावरू देण्यात येत आहे. त्यामुळे आता अजित पवार पुढे काय करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खरंतर अजित पवार यांनी राजकीय करिअरमध्ये घेतल्या सर्वात धाडसी निर्णय आता मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप सोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी आपण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस हे स्पष्ट केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

अजित पवार यांना मनवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाल्यानंतर अखेर पवार कुटुंबातील एका खास व्यक्तीने हस्तक्षेप केला.ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार होय. अजित पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रतिभाताई आणि पवारांचे जावई सदानंद सुळे यांनी संपर्क केला. या दोन व्यक्तींनी केलेल्या फोनमुळेच अजित पवारांनी बंड मागे घेतल्याचे समजते.

Loading...

इतर बातम्या - मोदी सरकारच्या बड्या मंत्र्याचा दावा, महाराष्ट्रात भाजपकडे बहुमत नाही

अजित पवार प्रतिभाताईंचा फार आदर करतात. त्यामुळेच त्यांच्याशी बोलल्यानंतर अजित पवारांनी बंड मागे घेतले. प्रतिभाताईंनी अजितदादांवर आईप्रमाणे प्रमुख केले आहे. विशेष म्हणजे प्रतिभाताई राजकीय घडामोडीत कधीही पडत नाहीत. पवारांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात प्रतिभाताई कधीच दिसल्या नाहीत.

'आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात शपथ घेतली, ही बाळासाहेबांची शिवसेना नाही'

पवार कुटुंबियांमधील या वादाच्या प्रसंगी प्रतिभाताई यांनी हस्तक्षेप केला. पवार कुटुंबात प्रतिभाताईंचे सर्वाधिक प्रेम अजितदादांवरच आहे. अजितदादा देखील त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नाहीत. अजित पवारांचे मन वळवण्यासाठी प्रतिभाताईंचा एक फोन कारणीभूत ठरल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...