Home /News /news /

हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, बारामतीसाठी अजितदादांनी अधिकाऱ्यांना बजावलं

हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, बारामतीसाठी अजितदादांनी अधिकाऱ्यांना बजावलं

अजित पवारांनी बारामतीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना नवे आदेश दिले.

बारामती, 18 जुलै : कोरोना विषाणूचा संसर्ग बारामती तालुक्यातही वाढत आहे. तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे  नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच या कामामध्ये कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अजित पवारांनी बारामतीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना नवे आदेश दिले. अजित पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, 'त्या' महिलेवर गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. 'कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसंच संस्थात्मक क्वारंटाइन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात.  बारामती शहरातील खासगी रूग्णालय कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घेण्याच्या बाबत अजित पवारांनी सूचना दिल्या. त्याच्यावर कोरोनाचा उपचार करू नका, वाचला तर भरचौकात फासावर लटकवा, मनसेची मागणी 'कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसूत्रता येईल. कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजेत', असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, Baramati, अजित पवार, बारामती

पुढील बातम्या