राजकारणात तिसऱ्या पिढीच्या एंट्रीला शरद पवारांचा ब्रेक

राजकारणात तिसऱ्या पिढीच्या एंट्रीला शरद पवारांचा ब्रेक

रच्यांनीच निवडणुका लढवायच्या तर कार्यकर्त्यांचं काय असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनीच त्यांच्या राजकीय एंट्रीला ब्रेक लावल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत्या.

  • Share this:

पुणे, 19 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त शरद पवार निवडणूक लढवणार. यात अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नसल्याचं दस्तरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलं आहे. ते पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार आणि रोहित पवार लोकसभा निवडणुका लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण घरच्यांनीच निवडणुका लढवायच्या तर कार्यकर्त्यांचं काय असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनीच त्यांच्या राजकीय एंट्रीला ब्रेक लावल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत्या.

अजित पवारांचा मुलगा मावळमधून लोकसभा लढवणार असल्याची होती चर्चा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मावळ लोकसभा मतदसंघातून पार्थ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती.

मावळमध्ये पार्थ यांच्या उमेदवारीवरून अजित पवार यांचा हट्ट अखेर शरद पवार पूर्ण करणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. पण घरातले सगळेच राजकारणात नको असं पवार म्हणाले आणि पार्थच्या राजकीय एंट्रीला ब्रेक लावला.

हेही वाचा: युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील, शरद पवारांची खोचक टीका

दरम्यान, पार्थ पवार हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. पार्थ पवार हे मागील निवडणुकीतच सक्रीय सहभागीही झाले होते.

अजित पवारांच्या पुतण्याचीही राजकारणात 'एंट्री' नाही

'सध्या आपण कार्यकर्ता म्हणून काम करत असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार आमदार निवडून आणायचे आहेत. तसंच वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक देखील लढवण्यास तयार असल्याचं', सूचक विधान अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी केलं होतं. पण त्यांनाही लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार हे सध्या पक्ष संघटनेत चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसत आहे. पुणे तसंच इतर जिल्ह्यामध्ये देखील ते पक्षाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे आगामी काळात रोहित पवार राजकारणात सक्रिय होणार अशा चर्चा होत्या. पण आता त्याला पुर्णविऱ्हाम लागला.


VIDEO : 'आज खाऊ मिळणार नाही', राज ठाकरेंची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या