पार्थबद्दल अजित पवारांचं अजून मौन, बारामतीहून तातडीने पुण्याला रवाना

पार्थबद्दल अजित पवारांचं अजून मौन, बारामतीहून तातडीने पुण्याला रवाना

अखेर, पार्थ यांची समजूत काढण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक झाली. या बैठकीसाठी अजित पवार जाणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण अजित पवार हे बैठकीसाठी उपस्थित होते.

  • Share this:

बारामती, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात हालचालींना वेग आला होता. अखेर, पार्थ यांची समजूत काढण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक झाली. या बैठकीसाठी अजित पवार जाणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण अजित पवार हे बैठकीसाठी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठक पूर्ण होताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्याहून ते मुंबईला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर या सगळ्या दरम्यान, पार्थ पवार बाबत काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. अजित पवार यांचा आज बारामती दौरा होता. आज त्यांनी बारामतीत विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली आणि कोरोना संदर्भात अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेऊन त्यांनी सुचना केल्या.

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान

चार वाजता काटेवाडी इथल्या निवासस्थानी कुटुंबियांसमवेत भोजन करून ते पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्याहून ते मुंबईला जाणार आसल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून देण्यात आली आहे. परंतु पार्थ पवारबाबत काल कुटुंबियांसमवेत बैठक झाली. यासंदर्भात त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

काय आहे वाद?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने एकीकडे सीबीआय चौकशीची मागणी करून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर अशात पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांनीच अशी मागणी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली.

पार्थ पवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राम मंदिर भूमिपूजनावर ट्वीट करून जय श्रीरामचा नारा दिला होता.

पार्थ यांच्या या भूमिकेची माध्यमांचा चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारले असता, 'मी माझ्या नातवाच्या भूमिकेला काडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे' असं म्हणून पार्थ यांचे कान उपटले होते. शरद पवार यांनी जाहीरपणे आपल्या नातवाचे कान उपटल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पार्थ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 16, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या