Home /News /news /

राजकीय स्फोटामागे अजित पवारांची 'दादा'गिरी जबाबदार? काँग्रेसकडूनही नाराजीचा सूर

राजकीय स्फोटामागे अजित पवारांची 'दादा'गिरी जबाबदार? काँग्रेसकडूनही नाराजीचा सूर

महाराष्ट्रातील या राजकीय परिस्थितीला अजित पवार जबाबदार आहेत का?...ही आहेत कारणं...

    मुंबई, 23 जून : शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत कलहानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांबाबतची नाराजी समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही बऱ्याचदा अनरिजेबल असल्याची तक्रार आमदारांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री भेटेना आणि उपमुख्यमंत्री जगू देईना, अशी स्थिती निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे. अडीच वर्षांच्या या कार्यकाळात निधीवरुनही अनेकदा आमदारांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप आहे. केवळ शिवसेनेतच दादांबद्दल नाराजी नव्हती. तर काँग्रेसमध्येही दादांबद्दल विरोधाचा सूर होता. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढून घेण्याबाबतही आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. काल शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगितलं होतं. पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कडक असला तरी निर्णय घ्या असं सांगितलं होतं. इतकच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडा असंही सांगितलं होत. सत्ता वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा असाही त्यांचा सल्ला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या कोणत्याही पर्यांयाचा स्वीकार केला नाही. आणि आघाडी सरकारकडून वेगळे व्हा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करा यावर शिंदे कायम आहेत. महाराष्ट्रातील या राजकीय परिस्थितीला अजित पवार जबाबदार आहेत का? - अजित पवार यांनी कॉंग्रेस आणि सेनेला सतत डावलले - निधी मिळत नव्हता आणि 'दादा'गिरी पण सहन करावी लागत होती - अनेक मंत्र्यांनीही आपापल्या नेत्यांकडे याची तक्रार केली होती - मुख्यमंत्री भेटेना आणि उपमुख्यमंत्री जगू देईना अशी स्थिती सत्तेतील सेनेची झाली -काँग्रेसचीही अजित दादा विरोधात नाराजी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar (Politician), Shivsena, काँग्रेस

    पुढील बातम्या