दणदणीत विजयानंतर अजित पवार पुन्हा 'नॉटरिचेबल', रोहित पवारांनी सांगितलं पण....

दणदणीत विजयानंतर अजित पवार पुन्हा 'नॉटरिचेबल', रोहित पवारांनी सांगितलं पण....

अजित पवार कुठे आहेत यासंबंधी रोहित पवारांना विचारलं असता शनिवारी सायंकाळी ते येतील असं त्यांनी सांगितलं होतं. पण...!

  • Share this:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 27 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सध्या सगळीकडे विजयाच्या सेलिब्रेशन मुडमध्ये आहेत. पण असं असताना विधानसभेत विक्रमी मतांनी दणदणीत विजय मिळवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे गेल्या 2 दिवसांपासून नॉरिचेबल आहेत. निवडणुकांच्या आधीही असेत अजित पवार गायब झाले. ते कोणाच्याही संपर्कात नव्हते आणि त्यानंतर मीडियासमोर येत त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता पुन्हा अजित पवार नेमके कुठे गेले असा सवाल जनतेकडून विचारण्यात येत आहे.

अजित पवार कुठे आहेत यासंबंधी रोहित पवारांना विचारलं असता शनिवारी सायंकाळी ते येतील असं त्यांनी सांगितलं होतं. पण संपूर्ण पवार कुटुंब शनिवारी संध्याकाळी गोविंद बागेत असतानादेखील अजित पवार हे तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे ते पुन्हा कुठे गेले असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीदेखील बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित होते पण अजित पवार मात्र गायब होते.

दरम्यान, निकाल लागल्यापासून अजित पवार हे गायब असल्याची माहिती देण्यात आली आहे. विधानसभेमध्ये अजित पवारांचा सगळ्यात जास्त मतांनी विजय झाला. यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या माध्यमांशी बोलताना दिसल्या. पण यावेळीदेखील अजित पवार कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे अजित पवार पुन्हा गायब का झाले? आणि आता ते कुठे आहेत? या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विरोधा पक्षात बसण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विधानसभेचा नवा विरोधी पक्षनेता कोण असणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या खात्यात अधिक जागा असल्यानं विरोधीपक्ष नेता राष्ट्रवादीचाच असणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

इतर बातम्या - मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले. 27 व्या फेरीअखेर बारामतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार 1,63,176  मतांनी आघाडी घेत विजयाचा झेंडा रोवला होता. तब्बल दिड लाखांचा आकडा अजित पवार यांनी पार केला.

सोमवारी 21 ऑक्टोबरला मतदानाला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुळगावी काटेवाडीत पहिल्यांदा जाऊन मतदान केलं होतं. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना देताना बारामतीकरांचे आभार मानले होते. बारामतीकरांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला. याही वेळी ते विश्वास दाखवतील असं अजित पवारांनी सांगितलं होतं. लोकशाहीचा हा उत्सव आहे. प्रत्येकाने मतदान करावं. निवडणुकीच्या प्रचारात अनेक गोष्टी होत असतात. मात्र, सगळी कटुता आता संपली पाहिजे. आघाडीला उत्तमं यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या आशेला बारामतीकरांनी साथ दिलं असंच म्हणावं लागेल.

इतर बातम्या - राष्ट्रवादीने भाजपला करून दिली 'बापा'ची आठवण, बॅनर लाऊन लिहिलं...

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली होती. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 27, 2019, 7:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading