Home /News /news /

पवार कुटुंबात पुन्हा All Is Well, असा निवळला पार्थवरील वाद

पवार कुटुंबात पुन्हा All Is Well, असा निवळला पार्थवरील वाद

आज बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबाची बैठक पार पडली. याबैठकीमध्ये आजोबा-नातवाच्या वादंगावर अखेर पडदा पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बारामती, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू होता. पण आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील वाद निवळला असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून देण्यात आहे. आज बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबाची बैठक पार पडली. याबैठकीमध्ये आजोबा-नातवाच्या वादंगावर अखेर पडदा पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली आहे. वाद निवळल्याने शरद पवार पुण्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. तर बैठक आवरून बारामतीहून अजिप पवार हे पुण्याला रवाना झाले असून ते त्यानंतर मुंबईत येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी रात्री काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक झाली. यावेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. या बैठकीला खुद्द अजित पवार उपस्थितीत होते. तसंच अजितदादा, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली. पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे आजोबा शरद पवार यांनी खडसावून काढल्यामुळे नाराज झालेल्या पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबीयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान नेमका काय होता वाद? अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने एकीकडे सीबीआय चौकशीची मागणी करून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर अशात पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांनीच अशी मागणी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. पार्थ पवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राम मंदिर भूमिपूजनावर ट्वीट करून जय श्रीरामचा नारा दिला होता. BREAKING : माजी भारतीय क्रिकेटपटूचा कोरोनामुळे मृत्यू पार्थ यांच्या या भूमिकेची माध्यमांचा चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारले असता, 'मी माझ्या नातवाच्या भूमिकेला काडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे' असं म्हणून पार्थ यांचे कान उपटले होते. शरद पवार यांनी जाहीरपणे आपल्या नातवाचे कान उपटल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पार्थ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Bollywood, Coronavirus, Pune news, Sharad pawar

पुढील बातम्या