'15 डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजवू- चंद्रकांत पाटील

पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवर खड्डे आहेत, '15 डिसेंबरपर्यंत राज्यात PWDच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत', असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय तर '15 डिसेंबरपर्यंत खड्डे न बुजल्यास काय करणार?' असा प्रतिसवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना केलाय. आयबीएन लोकमतच्या #अजेंडामहाराष्ट्र2017 या आयबीएन लोकमतच्या विशेष चर्चासत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2017 06:57 PM IST

'15 डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजवू- चंद्रकांत पाटील

मुंबई, 06 नोव्हेंबर : पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवर खड्डे आहेत, '15 डिसेंबरपर्यंत राज्यात PWDच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत', असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय तर '15 डिसेंबरपर्यंत खड्डे न बुजल्यास काय करणार?' असा प्रतिसवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना केलाय. आयबीएन लोकमतच्या #अजेंडामहाराष्ट्र2017 या आयबीएन लोकमतच्या विशेष चर्चासत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेही उपस्थित होते.

शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, ''राज्यात आम्ही फी रेग्युलेशन कायदा आणला, तसंच भारतातील पुस्तकांचं पहिलं गाव तयार केलं, शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडवून 16 लाख मुलांची कलमापन चाचणी केली.''

दिवाकर रावते यांनी मात्र, ही फक्त भाजप सरकारची तीन वर्षे पूर्ण झाल्याचं इथंही शिवसेनेचा सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या सरकारमधील सहभागाला तीन वर्षे होणं बाकी असल्याचं सांगत आम्हीच खऱ्याअर्थाने जनतेची कामं करत असल्याचा दावा केला. पण त्याचवेळी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणं शक्य नसल्याचंही सांगायलाही ते विसरले नाहीत. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपने मिळून गेल्या तीन वर्षात या महाराष्ट्राला फक्त खड्ड्यातच घातल्याचा गंभीर आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...