महाराष्ट्रात 1208 उद्योग आले- देसाई ; सरकार फसव्या जाहिरातींमध्ये मश्गुल- विखे

महाराष्ट्रात 1208 उद्योग आले- देसाई ; सरकार फसव्या जाहिरातींमध्ये मश्गुल- विखे

राज्यात युती सरकारने गेल्या तीन वर्षात 2408 उद्योगांचे करार केले, त्यापैकी 1208 उद्योग सुरू झाल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलाय. आयबीएनने लोकमतच्या #अंजेंडा महाराष्ट्र2017 या कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या वर्षातली महाराष्ट्र सरकारची कामगिरी दमदार आहे का या मुद्यावर पहिलं चर्चासत्रं घेण्यात आलं त्यात राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राम शिंदे हे देखील सहभागी झाले होते.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : राज्यात युती सरकारने गेल्या तीन वर्षात 2408 उद्योगांचे करार केले, त्यापैकी 1208 उद्योग सुरू झाल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलाय. आयबीएनने लोकमतच्या #अंजेंडा महाराष्ट्र2017 या कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या वर्षातली महाराष्ट्र सरकारची कामगिरी दमदार आहे का या मुद्यावर पहिलं चर्चासत्रं घेण्यात आलं त्यात राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राम शिंदे हे देखील सहभागी झाले होते.

या चर्चासत्रात मंत्र्यांनी सरकारची कामगिरी दमदार झाल्याचा दावा केला तर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणेच सरकारवर सडकून टीका केली. गेल्या 3 वर्षात राज्यात 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना युतीचं सरकार हे फसव्या जाहिरातबाजीत आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मश्गुल आहे. अशी बोचरी टीका विखे पाटलांनी केली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्जमाफीत खोटे प्रमाणपत्र वाटप झाल्याचंही विखे पाटलांनी म्हटलं.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी 'जे 70 वर्षांत झाले नाही ते 3 वर्षांत होईल अशा अनैसर्गिक अपेक्षांना आम्ही सामोरं जातोय, असं स्पष्टीकरण देत आपल्या खात्याच्या कामगिरीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गंत 6 हजार 608 किमीचे रस्ते लवकरच पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीही आपल्या जलंसधारणाच्या कामांचा पाढा वाचत सरकारची कामगिरी चांगलीच असल्याचा दावा केला तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रात 50 टक्के एफडीआय गुंतवणूक झाल्याचा दावा केला.

First published: November 6, 2017, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading