News18 Lokmat

बाबासाहेबांवर निबंध लिहून ऐश्वर्या सुतारचा पहिला नंबर

राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरमधल्या एका विद्यार्थिनीनं बाबासाहेबांवर एक निबंध लिहून देशात पहिला येण्याचा मान पटकावलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2017 06:19 PM IST

बाबासाहेबांवर निबंध लिहून ऐश्वर्या सुतारचा पहिला नंबर

संदीप राजगोळकर,14 एप्रिल : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असतानाच समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरमधल्या एका विद्यार्थिनीनं बाबासाहेबांवर एक निबंध लिहून देशात पहिला येण्याचा मान पटकावलाय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या या विद्यार्थिनीचं कौतुक होत असून ऐश्वर्या सुनील सुतार असं तिचं नावं आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या लखनऊमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानमार्फत देशभरातल्या विद्यार्थ्यांकडून हिंदी भाषेतून निबंध मागवण्यात आले होते. त्यासाठी विषय होता राष्ट्र व राष्ट्रीयत्व, या विषयावर डॉ. आंबेडकरांचे विचार आणि याची जाहिरात पाहिल्यावर कोल्हापूरमधल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या ऐश्वर्याने तब्बल 24 पानांचा एक निबंध लिहून पाठवला.

या निबंधामध्ये ऐश्वर्यानं बाबासाहेबांबद्दल भरपूर माहिती लिहिली होती.त्यानंतर या प्रतिष्ठानकडून निकाल घोषित करण्यात आला आणि देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्यानं पहिला क्रमांक पटकावलाय. आणि तिच्या या यशाबद्दल पंतप्रधांनांनी तिचा सत्कारही केला.

ऐश्वर्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच.वडिलांच्या निधनानंतर इतर घरांमध्ये घरकाम करून तिच्या आईनं तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत. पण ऐश्वर्याला मराठा बोर्डिंग हाऊसकडून 25 हजार रुपयांची मदत करण्यात आलीय. त्यामुळे आता ती दिल्लीतल्या सत्कारालाही उपस्थित राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...