मणिरत्नमच्या या सिनेमात एकत्र काम करणार ऐश्वर्या राय आणि 'कटप्पा'

मणिरत्नमच्या या सिनेमात एकत्र काम करणार ऐश्वर्या राय आणि 'कटप्पा'

ऐश्वर्याने तिच्या सिनेकरिअरची सुरुवात १९९७ मध्ये मणीरत्नम यांच्या तमिळ 'इरुअर' सिनेमातूनच केली होती. नंतर दोघांनी 'गुरू' आणि 'रावण' सिनेमात एकत्र काम केलं.

  • Share this:

मुंबई, २१ एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दिग्दर्शक मणीरत्नम यांनी याआधीही अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या- मणीची ही जोडी आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. बी-टाऊनमधील चर्चेनुसार, मणीरत्नम लवकरच एका हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची सूत्र हातात घेणार आहेत. असंही म्हटलं जातंय की, या सिनेमाची मुख्य अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याचं नाव पुढे येत आहे.

या सिनेमाची विशेष गोष्ट म्हणजे बाहुबली सिनेमात कटप्पाची व्यक्तिरेखा साकारलेले सत्यराजही या सिनेमात दिसणार आहेत. बिग बजेट पोन्निनी सेल्वममध्ये सत्यराज ऐश्वर्याच्या पतीची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन सिनेमात कॅमिओ करू शकतात.

मणिरत्नम यांनी ऐश्वर्या आणि अमिताभ दोघांनाही या सिनेमासाठी विचारलं आहे. या बिग बजेट आणि मल्टिस्टारर सिनेमाची कथा तमिळ पौराणीक कथेवर आधारित आहे. या कथेत ऐश्वर्या एका राजकुमारीची भूमिकेत दिसले. एक अशी राजकुमारी जी राजाशी लग्न करते आणि राणी झाल्यावर आपल्या ताकदीचा दुरुपयोग करते.

ऐश्वर्याने तिच्या सिनेकरिअरची सुरुवात १९९७ मध्ये मणीरत्नम यांच्या तमिळ 'इरुअर' सिनेमातूनच केली होती. नंतर दोघांनी 'गुरू' आणि 'रावण' सिनेमात एकत्र काम केलं.


Loading...

कपिल शर्मा शोवर पहिल्यांदा एकत्र येणार काजोल- करण, सेटवरचे फोटो लीक


'या' कारणासाठी सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी


'हा' दाक्षिणात्य 'कॉमेडी किंग' 'दबंग 3'मध्ये बनणार सलमानचा उजवा हात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...