Elec-widget

कंगाल पाकिस्तानचं पुन्हा जगभरात झालं हसं, बसला 18 कोटींचा फटका!

कंगाल पाकिस्तानचं पुन्हा जगभरात झालं हसं, बसला 18 कोटींचा फटका!

आर्थिकपरिस्थिती डबघाईला गेलेली असताना पाकिस्तानच्या सरकारी विमान सेवेनं मोठा घोटाळा केला आहे.

  • Share this:

कराची, 21 सप्टेंबर : पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक (Economy) परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. यातच आता पाकिस्ताननं स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याच काम केलं आहे. आर्थिकपरिस्थिती डबघाईला गेलेली असताना पाकिस्तानच्या सरकारी विमान सेवेनं मोठा घोटाळा केला आहे.

जियो न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या ऑडिट रिपोर्टनुसार 18 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तान एअरलाईन्स (पीआयए) गेल्या काही दिवसांपासून विमानात प्रवासी नसताना विमान उडवत आहेत. मुख्य म्हणजे पीआईएनं एक किंवा दोन नाही तर चक्क 82 रिकामी विमानं उडवली आहेत. सरकारी कंपनीच्या या घोटाळ्यानं जवळ जवळ 18 कोटींचे नुकसान झाले आहे.

जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय विमान सेवानं इस्लामाबादहून रवाना होत हवेत काही काळ घालवत पुन्हा इस्लामाबादमध्येच विमान उतरवले. पीआयएनं एक-दोन नाही तर चक्क 82वेळा असा प्रकार केला. रिपोर्टनुसार 2016-2017मध्ये 46 विमानांचे उड्डाण केले, यात एकही प्रवासी विमानातून प्रवास करत नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हज येथे जाणारी 36 विमाने रिकामी होती. यामुळं पीआयएला 18 कोटींचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सरकार काही दिवसांनंतर चौकशी करणार आहे.

वाचा-पाकच्या पंतप्रधानांची घाबरगुंडी, काश्मीरसंदर्भात जिहाद्यांना दिला 'हा' इशारा

दुसरीकडे पाकिस्तान देशाचे कर्ज तब्बल 6 अरब डॉलर झाले आहे. मुडीजच्या 36 महिन्यांच्या कराराशिवाय दुसऱ्या देशांना कर्ज आणि व्याज दरामुळं चालु खात्यांमध्येही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या सगळ्याचा फटका कर्ज घेणाऱ्या देशांवर पडणार आहे.

Loading...

पाकला होत आहे मोठा तोटा

पाकिस्तानची सध्याची परिस्थिती फॉरेन एक्सचेंज इनफ्लोमध्ये झालेल्या कमीमुळं गंभीर झाली आहे. असंतुलनमुळं गेल्या दोन वर्षात पाकिस्तानचे व्याज 7.50 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळं डबघाईला आलेल्या या देशात अशा अतरंगी गोष्टी घडत असल्यामुळं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

वाचा-मोठी बातमी! काश्मीर मुद्यावरून आता चीनकडूनही पाकिस्तानला दणका

पाकच्या पंतप्रधानांची घाबरगुंडी

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरला आहे. मोदी सरकारनं 5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक ताणले गेले आहेत. कलम 370चा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून वारंवार उपस्थित करण्यात आला. मात्र पाकच्या पदरी नेहमी निराशाच पडली आहे. भारताला काश्मीरमधील लोकांवर कारवाई करण्यासाठी फक्त कारणच हवं आहे, अशी वायफळ बडबड इमरान खान यांनी पुन्हा केली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील तोरखाम टर्मिनलच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळेस त्यांनी पुन्हा एका असा दावा केला की, काश्मीर मुद्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी भारताकडून पुन्हा खोटे आरोप केले जाण्याची शक्यता आहे.

वाचा-पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO

VIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: imran khan
First Published: Sep 21, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...