जेव्हा पाकिस्तानाच्या कैदेत होते हे ८ फिल्मी ‘सैनिक’

पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना भारतीय वायुसेनेचा पायलट पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचला. यानंतर चारही बाजूंनी त्याला भारतात परत आणण्याची मागणी केली जाऊ लागली.

News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2019 12:16 PM IST

जेव्हा पाकिस्तानाच्या कैदेत होते हे ८ फिल्मी ‘सैनिक’

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दणक्यात एअर स्ट्राइक करत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर अनेक वायु आणि भूदल हल्ले केले. याला प्रत्युत्तर देताना भारतीय वायुसेनेचा पायलट अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचला. यानंतर चारही बाजूंनी पाकिस्तानमधून अभिनंदनला परत भारतात आणण्याची मागणी केली जाऊ लागली. बॉलिवूडमध्येही अभिनेत्यांनी अशा अनेक रिअल लाइफ हिरोंची व्यक्तिरेखा साकारली आहे जे युद्ध काळात शत्रू राष्ट्राकडून पकडले गेले आहेत. (Prisoner Of War)

सैनिक- अक्षय कुमारचा हा सिनेमा १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याने एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका वठवली होती. एका मोठ्या ऑपरेशनसाठी त्याला सुट्टीवरून तातडीने बोलावण्यात येते. नंतर त्याच्या मृत्यूची बातमी समोर येते. सिनेमा संपताना लोकांना कळतं की तो जीवंत असून कित्येक वर्ष पाकिस्तानच्या कैदेत होता आणि नंतर तिथून तो भारतात परत आला.

सरबजीत- सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. भारतातला एक शेतकरी चुकून पाकिस्तानच्या सीमेपलीकडे जातो आणि पाकिस्तान त्याला भारताचा गुप्तहेर म्हणून अटक करतात. अनेक वर्षांच्या कुटुंबाच्या संघर्षानंतर जेव्हा पाकिस्तानला सत्य कळतं तेव्हा ते सरबजीतला तुरुंगातच मारून टाकतात.

Loading...

ट्यूबलाइट- या सिनेमात भारत- चीनमधील युद्धाची झलक दाखवण्यात आली होती. यात सलमानचा भाऊ युद्धात मारला गेल्याची बातमी येते. मात्र सिनेमाला फिल्मी ट्विस्ट दिला जातो.

१९७१- हा सिनेमाही सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमात सहा सैनिक पाकिस्तानच्या कैदेत असतात पण तिथून पळून जाण्यात ते यशस्वी होतात. हे जवान आपल्या जीवाची बाजी लावत देशाच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी लढतात.

ललकार- १९७२ मध्ये आलेल्या या सिनेमात एका कुटुंबातील दोन भावांची कथा सांगण्यात आली आहे. यातील एक भाऊ लष्करात असतो तर दुसरा भाऊ वायुसेनेत असतो. दोन्ही मुलांना जपान विरुद्धच्या लढाईत पाठवण्यात येतं. इथे ते जपानी सैनिकांच्या तावडीत सापडतात. पण हे भाऊ फक्त मिशनच पूर्ण करत नाहीत तर शत्रूंच्या तावडीतून सुटून भारतात परततातही.

दीवार- २००४ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमात अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमात भारतीय सेनेचे मेजर त्यांच्या ३० सैनिकांसह पाकिस्तानात कैदी असतात. अनेक वर्ष तिथून निघण्याचा प्रयत्न करूनही ते निघू शकत नाहीत पण तरीही ते मास्टर प्लॅन करतात आणि पाकिस्तानातून भारतात येतात.

रोजा- जम्मू- काश्मीर येथील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची कथा बेतलेली आहे. काश्मीरमध्ये वसीम या कुख्यात दहशतवाद्याल पकडलं जातं. तर दहशतवाद्यांची एक तुकडी रॉसाठी काम करणाऱ्या ऋषीचे अपहरण करते. यावेळी ऋषीच्या मोबदल्यात वसीमची मागणी दहशतवादी करतात. यात ऋषी फक्त त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी होतो असं नाही तर अनेक दहशतवाद्यांना ठार करतो.

चिल्ड्रन ऑफ वॉर- २०१४ मध्ये आलेल्या या सिनेमाची कथा बांग्लादेशमध्ये होणाऱ्या सत्य घटनेवर आधारीत आहे. सिनेमात युद्धासाठी बलात्कार आणि धर्म याचा वापर कसा केला जातो ते दाखवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...