एअर इंडियाला विकण्यासाठी मोदी सरकारचा प्लान तयार, 17 मार्चपासून लागणार बोली

एअर इंडियाला विकण्यासाठी मोदी सरकारचा प्लान तयार, 17 मार्चपासून लागणार बोली

मंत्र्यांच्या गटाने अलीकडे एअर इंडियाची विक्री करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : कर्जाचा डोंगर असलेल्या सरकारी विमानचालन कंपनी एअर इंडियाची (Air India Sale) संपूर्ण भागीदारी विकण्यासाठी सरकार आता बोली लावणार आहे. त्याची अंतिम तारीख 17 मार्च 2020 आहे. तसेच सरकारने एअर इंडिया एक्स्प्रेस ( Air India Express)आणि विमानतळ सेवा कंपनी आयसॅट्स (AISATS )या सहाय्यक कंपन्यांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. मंत्र्यांच्या गटाने अलीकडे एअर इंडियाची विक्री करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सरकार एअर इंडियाची 100% भागीदारी विक्रीसाठी काढणार आहे. मागच्या वर्षी 76% शेअर विकण्यासाठी बोली लावण्यात आली होती, पंरतु, कोणी खरेदीदारच मिळाला नाही. यानंतर, व्यवहार सल्लागार ईवायने निविदा प्रक्रिया अयशस्वी होण्यामागील कारणांचा अहवाल तयार केला. यावेळी अहवालाच्या आधारे परिस्थिती बदलण्यात आली आहे.

एअर इंडिया बर्‍याच दिवसांपासून तोट्यात आहे. 2018-19 मध्ये 8,556.35 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या विमान कंपनीवर 50,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. म्हणूनच सरकारला एअर इंडियाची विक्री करायची आहे. मार्चपर्यंत विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून असे म्हटले गेले होते की, नवीन खरेदीदार न मिळाल्यास आर्थिक संकटातून जाणारी एअर इंडिया बंद करावी लागेल. छोट्या भांडवलाच्या मदतीने या एअर इंडियाचे काम सुरू ठेवणं अवघड आहे.

First published: January 27, 2020, 11:11 AM IST

ताज्या बातम्या