विमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी

विमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी

पहिल्यांदा दोषी आढळल्यास त्या पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केलं जातं. दुसऱ्यांदा तीन वर्षांसाठी आणि तिसऱ्यांदा त्या पायलटने तोच गुन्हा केल्यास त्याचं लायसन्स कायमचं रद्द केलं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली, ता.13 नोव्हेंबर : विमान उड्डाणाआधी दारू पिणाऱ्या एअर इंडियाच्या एका जेष्ठ पायलटची मंगळवारी हकालपट्टी करण्यात आलीय. कॅप्टन अरविंद कठपालीया असं या पायलटचं नाव असून सर्व महत्वांच्या पदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्याचं लायसन्स तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय.


रविवारी नवी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानाचे अरविंद हे मुख्य कॅप्टन होते. नियमानुसार घेतलेल्या चाचणीत त्यांच्या रक्तात अल्कोहलचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळं तातडीनं त्यांना विमान उड्डाणापासून रोखण्यात आलं आणि कारवाई करण्यात आली. त्यामुळं विमान उड्डाणाला विलंबही झाला होता.


या प्रकरणाची गंभीर दखल विमान वाहतूक मंत्रालयानं घेतली होती. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कडक कारवईचे आदेशही दिले होते. त्यानंतर अरविंद यांची चौकशी करून त्यांना सर्व पदावरून हटवण्यात आलंय.

या आधी 2017 मध्येही ते अशा चाचणीत दोषी आढळले होते.


त्यानंतर त्याचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. नंतर पुन्हा त्यांना कामावर घेण्यात आलं. ही त्यांची असाच प्रकार करण्याची ही दुसरी वेळ आहे. हवाई वाहतूक नियमांनुसर विमान उड्डाणाआधी पायलटला 12 तास आधी दारू पिण्यास बंदी आहे. प्रत्येक पायलटला उड्डाणाआधी एक टेस्ट द्यावी लगाते.


त्यात दारू घेतल्याचं आढळल्यास कारवाई केली जाते. पहिल्यांदा दोषी आढळल्यास त्या पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केलं जातं. दुसऱ्यांदा तीन वर्षांसाठी आणि तिसऱ्यांदा त्या पायलटने तोच गुन्हा केल्यास त्याचं लायसन्स कायमचं रद्द केलं जातं.

Video : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 09:04 PM IST

ताज्या बातम्या