Republic Day Sale: केवळ 979 रुपयात करा विमान प्रवास

Republic Day Sale: केवळ 979 रुपयात करा विमान प्रवास

एअर इंडियाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी: एअर इंडियाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत जाहीर केली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी एअर इंडियाने 979 रुपयापासून तिकीट उपलब्ध करुन दिले आहे. या बंपर सेलमधील तिकिटांची विक्री केवळ ३ दिवसच चालणार आहे. प्रवाशांना 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2019 या काळात तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांना 3 दिवसात 30 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रवासाचे तिकीट बुक करता येईल, असे एअर इंडियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

असे मिळेल तिकीट आणि काय आहेत अटी

एअर इंडियाने सुरु केलेल्या या सेलमधील तिकीटांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार केली जाणार आहे. एअर इंडियाच्या वेबसाईटवरून, एअरलाईन बुकिंग ऑफिस, कॉल सेंटर्स आणि ट्रव्हल एजन्टकडून देखील या तिटिकांची खरेदी करता येईल.

केवळ 979 रुपयात प्रवास

भारतातल्या भारतात प्रवास करण्यासाठी इकॉनमी क्लासचे तिकीटाचा सर्वात कमी दर हा 979 इतका असेल. तर बिझनेस क्लासच्या तिकिटाचा तर 6 हजार 965 इतका असेल. या दोन्ही रक्कमेवर कर लागू असतील.

अमेरिकेचा प्रवास सर्वात स्वस्त

आंतरराष्ट्रीय रुटवर अमेरिकेचा प्रवास सर्वात स्वस्त आहे. राऊंड ट्रिप तिकीटाची सुरुवातीची किमत 55 हजार आहे. ब्रिटन आणि युरोपसाठी इकॉनमी क्लासचा सुरुवातीचा दर 32 हजार रुपये आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी हा दर 50 हजार इतका आहे.

VIDEO : 'हम चलते है ऐसे तो दिल दुश्मन के हिलते है...' जवानांनी गायलं गाणं

First published: January 26, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading