29 मार्च : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या खासदार रविंद्र गायकवाड यांचं दोनदा बुक केलेलं तिकिट रद्द केलंय. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी गायकवाडांनी दोन वेळेस एअर इंडियाचं तिकिट बूक केलं पण दोन्ही वेळेस तिकिट रद्द होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. विमान प्रवास बंदीवर एअर इंडिया ठाम आहे. त्यामुळेच शेवटी अधिवेशनासाठी शिवसेना खासदारांना रेल्वेनं प्रवास करत आज दिल्ली गाठावी लागणार आहे.
बिझनेस क्लास ऐवजी इकोनॉमी क्लासमध्ये बसवल्याच्या रागातून रविंद्र गायकवाडांनी सुकूमार यांना मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यानंतर पासून रवींद्र गायकवाड तसे गायबच आहेत.
एकीकडे रवींद्र गायकवाड यांच्यावर जोरदार टीका होत असताना संसदेत मात्र शिवसेनेने त्यांची बाजू लावून धरली आहे. तसंच काल (मंगळवारी) शिवसेना नेत्यांनी विमान कंपन्यांविरोधात हक्क भंग दाखल केला आहे. विमानात गोंधळ घालणाऱ्या कपिल शर्मावर कारवाई होत नाही मग रवींद्र गायकवाडांवर कारवाई का ? असा शिवसेनेचा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.