मुस्लिमांनी आरक्षण मागितलं तर काय चुकलं? - ओवेसी

मुस्लिमांनी आरक्षण मागितलं तर काय चुकलं? - ओवेसी

भारतातल्या मुस्लिमांनी आरक्षण मागितलं तर त्यात काय चूक आहे असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असाद्दुदीन ओवेसी यांनी केला आहे.

  • Share this:

मिरज,ता.27 जुलै : भारतातल्या मुस्लिमांनी आरक्षण मागितलं तर त्यात काय चूक आहे असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असाद्दुदीन ओवेसी यांनी केला आहे. मुस्लिमांवर कायम अन्यान होत आला काँग्रेसने मुस्लिमांचा फक्त व्होट बँकेसारखा वापर केला असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठीशी घालत आहेत असा आरोपही ओवेसींनी केला. मिरजमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

जेव्हापासू भाजप सत्तेवर आली तेव्हापासून दलित, मुस्लिम आणि वंचितांवर कायम अन्याय होत आला आहे. त्यामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला असून मुख्य प्रवाहापासून दूर गेला.

या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात एमआयएम आणखी जास्त काम करणार असून आम्ही लढत राहू असंही त्यांनी सांगितंल. नरेंद्र मोदी हे जर तुमचे मेहबुब असतील तर मी दिन दलितांचा गुलाम आहे असंही ते म्हणाले.

हेही वाचा...

चंद्रग्रहणाची छाया, कर्नाटकातले नेते देवपूजेत व्यस्त

चंद्रग्रहण 2018 : समज आणि गैरसमज

आजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा!

रिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading