गावचे सरपंच आहे भारी, कोरोना आला नाही दारी, महाराष्ट्रातील एकमेव असे गाव!

गावचे सरपंच आहे भारी, कोरोना आला नाही दारी, महाराष्ट्रातील एकमेव असे गाव!

हिवरेबाजार आज कोरोनाच्या संकटात अगदी निर्धास्त आहे आणि त्याचे कारण म्हणजे कोरोनासाचा प्रादुर्भाव सुरू होताच पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे.

  • Share this:

अहमदनगर, 02 जून : राज्यात आदर्शग्राम म्हणून ओळख असलेले हिवरेबाजार ग्राम आज कोरोनाच्या महामारीत अगदी सुरक्षित आहे. मुंबई, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यात वसलेले हिवरेबाजारचे नागरिक गावाकडे परतले असले तरी हिवरेबाजारने स्वयंशिस्तीचा दिलेला धडा या सर्वांनी पाळल्याने गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. आणि हे सर्व शक्य झाले आहे ते आदर्शग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनामुळे.

राज्यातील आदर्शग्राम हिवरेबाजार परिसरात सर्वात कमी पाऊस असला तरी बारामाही हिरवाईने नटलेले आणि जिल्ह्यात दरडोई उत्पन्नाने सर्वोच्च असलेले हिवरेबाजार आज कोरोनाच्या संकटात अगदी निर्धास्त आहे आणि त्याचे कारण म्हणजे कोरोनासाचा प्रादुर्भाव सुरू होताच पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे.

हेही वाचा -पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा

सध्या मोठा शहरातून गावाकडे परतणारे काहीजण कोरोनाचा वाणवळा घेऊन येत असून गाव बाधित करत आहेत, मात्र, हिवरेबाजारमध्ये स्वयंशिस्त असल्याने एक तर होम क्वारंटाइन अथवा संस्थात्मक क्वारंटाइन होत सर्व नियम पाळले जात आहेत.

गावकरीही शारीरिक अंतर पाळत नित्यनियमांचे पालन करताना दिसून येतात. तसंच गावातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने गावातील शंभर टक्के नागरिकांची नियमित तपासणी सुरू ठेवत सर्वांच्या आरोग्यावर नजर ठेवली आहे.

हेही वाचा -तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत करोनाने मृत्यू, 10 तास नाही मिळाला बेड

गावाकडे परतणाऱ्या शहरी नागरिकांमुळे राज्यातील अनेक गावांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या संकटाकडे डोळसपणे पाहात नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेले निर्देश पाळणे गरजेचे आहे, आणि हेच निर्देश स्वयंशिस्त पाळणारे आदर्शग्राम हिवरेबाजारचे ग्रामस्थ आणि परतणारे शहरी नागरिक पाळत असल्याने हिवरेबाजार कोरोनाच्या या संकटात आज सुरक्षित आहे.

हाच आदर्श राज्यातील इतर गावांनी आणि त्या गावांत परतणाऱ्या शहरी नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या