मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अहमदनगर जिल्ह्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांबाबत संतापजनक प्रकार समोर

अहमदनगर जिल्ह्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांबाबत संतापजनक प्रकार समोर

'आर्सेनिक अल्बम' गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

'आर्सेनिक अल्बम' गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

'आर्सेनिक अल्बम' गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर, 3 जानेवारी : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींकडे नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या 'आर्सेनिक अल्बम' गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार उघड झाला आहे. ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज जिल्हा परिषदेने जमा करुन घेऊन त्याच्या मोबदल्यात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लागणाऱ्या आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. सदर गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषदिला पुणे येथील सुमन होमिओ फार्मसी यांनी पुरवठा केल्या आहेत. मात्र त्या डब्यात गोळ्याऐवजी पाणी, तसेच घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ तयार झाला आहे. यामुळे गोळ्यांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या खात्यावर तब्बल पाच महिन्यांपूर्वी 1 लाख 48 हजार 760 रुपये इतकी रक्कम सदर गोळ्यासाठी जमा केली होती. पंचायत समितीमधून गोळ्या घेऊन जाण्यासाठी फोन आला असता ग्रामपंचायतचे शिपाई बबन बोरुडे हे गोळ्यांचे पाकीट घेऊन आले होते. गोळ्यांच्या दर्जामुळे नागरिकांनी गोळ्या घेण्यास नकार दिला. शनिवारी सकाळी नागरिकांना सदर गोळ्या वाटप करण्यासाठी घेतल्या असता बहुतांश डब्यात पातळ द्रव व घट्ट झालेला द्रव दिसून आला. कोरोनासारख्या संकटकाळातही असा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
First published:

Tags: Ahmednagar, Crime news

पुढील बातम्या