अहमदनगर, 27 एप्रिल: बोल्हेगावात रस्त्याबाबत शहर अभियंता वालझाडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपैकी एकाने बूट फेकून मारल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी दुपारी महापालिका कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अभियंत्यांनी बूट फेकण्याच्या प्रकाराचा निषेध केला आहे. निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिकेतील सर्व अभियंत्यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.