अहमदनगर : अतिक्रमण पथकासमोरच त्याने पेटवून घेतलं

अतिक्रमणाच्या नावाखाली घरं पाडण्यासाठी आलेल्या पथकासमोर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडलीये.

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 08:57 PM IST

अहमदनगर : अतिक्रमण पथकासमोरच त्याने पेटवून घेतलं

11 मे : अतिक्रमणाच्या नावाखाली घरं पाडण्यासाठी आलेल्या पथकासमोर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. अनिल कुलकर्णी असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील गळनिंब इथं ही धक्कादायक घटना घडलीये. जागा आमची वडिलोपार्जित आहे असं ओरडून ओरडून सांगत असतानाही अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या तहसिलदार, पोलीस आणी ग्रामपंचायत सदस्यांसमोर गावातील अनिल कुलकर्णी यांनी पेटवून घेतले यात ते 70 टक्के भाजले असल्याची माहिती मिळतेय त्यांच्यावर प्रवरा हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. ज्या जागेवर आमचे घर आहे ती जागा आमची वडिलोपार्जित असूनही गावातील काही जणांनी जाणून बुजून त्यांना अनेक दिवसांपासून त्रास दिला असल्याचं अनिल कुलकर्णी यांच्या पुतण्याने म्हटलंय.

अनिल कुलकर्णी यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून बाहेरगावी राहत होते मात्र काही वर्षांपूर्वी ते या गळनिंब गावात रहायला आले आणि आपल्या वडिलोपार्जित जागेत हनुमान मंदिराशेजारी घर बांधलं. मात्र दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये सत्तापालट झाली आणी त्यांनी कुलकर्णींना तुमचं घर अतिक्रमणात असल्याची आवई उठवली. धाक दडपशाही करून काही दिवसांपूर्वी घर पाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे कुलकर्णींनी कोर्टात धाव घेतली. मात्र, कोर्टाचा कोणताही निर्णय झालेला नसताना आज अचानक तहसिलदार आणि पोलीस पथकासह घर पाडण्यासाठी दाखल झाले. मात्र कुलकर्णींनी घर पाडण्यास विरोध केला. जेव्हा आपलं कोणी ऐकत नाहीये असं म्हटल्यावर त्यांनी थेट स्वतःहाला पेटवून घेतलं. आमच्यावर अन्याय केला जात असल्याची भावना त्यांच्या कुटुंबियाने व्यक्त केली आहे.

ही जागा ग्रामपंचायतची असून अनेकदा नोटिसा देवूनही घर खाली केलं जात नसल्याने ही कारवाई केली असल्याच उपसरपंच  काशिनाथ चिंधे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close