हत्या केल्यानंतर पत्नीचं कापलेलं शीर घेऊन पोलिसांत गेला पती, कारण...!

हत्या केल्यानंतर पत्नीचं कापलेलं शीर घेऊन पोलिसांत गेला पती, कारण...!

आरोपी पतीने पत्नीचा गळा कापून तिची हत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर तिचं कापलेलं शीर थेट पोलीस चौकीत घेऊन गेला.

  • Share this:

आगरा (उत्तर प्रदेश), 11 नोव्हेंबर : दारूने अनेकांचा घात केला. दारूमुळे सुखी संसाराची वाट लागली अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी नकार दिल्यामुळे पतीने तिच्या हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीने पत्नीचा गळा कापून तिची हत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर तिचं कापलेलं शीर थेट पोलीस चौकीत घेऊन गेला. हा गंभीर प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांनाही घाम फुटला.

या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून आता पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी चौकीत आणलेलं पत्तीचं शीर आणि उर्वरित मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

हत्येची ही घटना हरीपर्वत परिसरातील पोलिस स्टेशनच्या एत्माद्दौलाची आहे. एत्माद्दौलाचा रहिवासी चोबसिंग यांची मुलगी शांतीचे 17 वर्षापूर्वी कछपुरा येथील नरेशशी लग्न झाले होते. नरेश टीव्ही रिपेयरिंग करायचा. त्याला सात वर्षाचा अंकित आणि तीन मुली आहेत. नरेशला दारू पिण्याची व्यसनाधीनता असल्याचा आरोप आहे. तो रोज पत्नीशी भांडत असे. रविवारी संध्याकाळी नरेश दारून पिऊन आला आणि त्याने शांतीशी भांडणं करण्यास सुरुवात केली. तिला मारहाण केली.

इतर बातम्या - अमर प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडले प्राण, सोबतच निघाली अंत्ययात्रा

शांतीने दारू पिण्यासाठी नरेशला नकार दिल्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने रागात तिची हत्या केली. त्याने चाकूने तिचा गळा कापला. गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे यात शांतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नरेशने पत्नी शांतीचं शीर शरीरापासून वेगळं केलं आणि ते घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेशने मृत शांतीचे शीर एका डब्यात ठेऊन तो पोलीस स्थानकात दाखल झाला. पोलीस प्रभारी अजय कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो आता प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तर दारू पिण्यासाठी पत्नीने नकार दिल्यामुळे रागात तिची हत्या केल्याची कबुली आरोपी नरेशने पोलिसांना दिली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 11, 2019, 6:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading