मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'ना बीवी, ना बच्चा, सबसे बड़ा रुपैया', कोट्यवधींची लॉटरी लागल्यानंतर त्याने थेट गर्लफ्रेंड सोडली

'ना बीवी, ना बच्चा, सबसे बड़ा रुपैया', कोट्यवधींची लॉटरी लागल्यानंतर त्याने थेट गर्लफ्रेंड सोडली

तब्बल 35 कोटींची लॉटरी लागली म्हणून एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. त्याच्या या कृत्याची सध्या जगभरात चर्चा आहे.

तब्बल 35 कोटींची लॉटरी लागली म्हणून एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. त्याच्या या कृत्याची सध्या जगभरात चर्चा आहे.

तब्बल 35 कोटींची लॉटरी लागली म्हणून एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. त्याच्या या कृत्याची सध्या जगभरात चर्चा आहे.

  • Published by:  Chetan Patil

कॅनडा, 26 डिसेंबर : काही लोक पैशांच्या अमिषापायी कोणत्या थरावर जातील याचा काहीच भरोसा नाही. ते पैशांसमोर नातीगोती, मित्रमंडळी कुणाचाच विचार करत नाहीत. ते फक्त पैसा आणि मजामस्ती यालाच महत्त्व देतात. अशीच काहिशी घटना कॅनडाच्या ओन्टारियो येथून समोर आली आहे. तब्बल 35 कोटींची लॉटरी लागली म्हणून एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. त्याची गर्लफ्रेंड त्या लॉटरीच्या रकमेवर अर्धा वाटा मागेल, या विचाराने त्याने तिच्यासोबत असणारं नातं तोडलं आहे. आपला प्रियकर अशा स्वार्थीपणाने वागून मन मोडून निघून गेला म्हणून संबंधित महिला आतून खचली आहे. पण तिने धैऱ्याने प्रियकाराला धडा शिकवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिने थेट कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत 'द सन'ने वृत्त दिलं आहे

संबंधित महिलेचं डेनिस रॉबर्टसन असं नाव आहे. तर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं मॉरिस थिबॉल्ट असं नाव आहे. मॉरिसला जी 35 कोटींची लॉटरी लागली आहे त्यामध्ये आपला अर्धा हक्क असल्याचं डेनिसने म्हटलं आहे. तसेच मॉरिसने आपली फसणूक केल्याने त्याने 2 कोटी 86 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी डेनिसने केली आहे. "आम्ही दोघं एकत्र राहायचो. आम्ही दर आठवड्याला लॉटरीचं तिकीट घेण्याचं ठरवलं होतं. तसेच जेव्हा आम्हाला लॉटरी लागेल तेव्हा आम्ही त्या लॉटरीची किंमत दोघांमध्ये आर्धे-आर्धे वाटून घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर आम्ही दोन्ही मिळून मोठं घर घेण्याचं ठरवलं होतं", असं डेनिसने सांगितलं आहे.

हेही वाचा : धक्क्यावर धक्के, आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना

जेव्हा लॉटरी लागली तेव्हा मॉरिसने डेनिसला अर्धा वाटा देण्यास विरोध केला. पण कॅनेडाच्या कायद्यानुसार ते जरी पती-पत्नी नव्हते तरी ते त्या नात्यात होते ज्याचे लग्नाबरोबरचे समान अधिकार होते. डेनिसला एक मुलगी देखील आहे. ती मुलीसह 2017 पासून मॉरिससोबत राहत होते. याच गोष्टीचा धागा पकडत डेनिसच्या वकिलांनी कोर्टात मोठा युक्तीवाद केला. दोघांमध्ये करार झाला होता. ते दोघं सोबत लॉटरीचं तिकीट खरेदी करायचे. त्यांनी त्यावर दोघांचा समान अधिकार असल्याचं म्हटलं होतं. पण मॉरिसने लॉटरी लागल्यानंतर डेनिसला पैसे देण्यास नकार दिला, असं वकिलांनी कोर्टात म्हटलं.

डेनिसच्या वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, लॉटरी लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी मॉरिस घर सोडून गेला. डेनिसने त्याला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण तो आपली नोकरीदेखील सोडून गेल्याचं तिला माहिती पडलं. त्यानंतर तिने त्याला फोन केला. तेव्हा त्याने आपण ब्रेकअप करत असून परत कधीच येणार नाही, असं सांगितलं.

दुसरीकडे मॉरिसच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना डेनिसच्या वकिलांनी केलेले सर्व दावे फेटाळले. मॉरिसने तसं काहीच केलेलं नाही. मॉरिसने त्याच्या स्वत:च्या पैशांनी तिकीट खरेदी केलं आणि त्या पैशांवर फक्त त्याचा अधिकार आहे, असा मॉरिसच्या वकिलांनी दावा केला आहे.

First published: