काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं

कुत्रा मेल्याचं सांगत कचऱ्यासोबतच त्यांनी ट्विंकलच्या मृतदेहास जाळलं होतं.

  • Share this:

2 वर्षांआधी झालेल्या ट्विंकल डागरे या काँग्रेस नेत्याच्या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी स्थानीय भाजप नेता आणि त्यांच्या 3 मुलांसह 5 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांचा दावा आहे की या आरोपींनी अभिनेता अजय देवगन याची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 'दृश्यम' पाहून हे हत्याकांड केलं आहे.

पोलिसांचा दावा आहे की या आरोपींनी अभिनेता अजय देवगन याची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 'दृश्यम' पाहून हे हत्याकांड केलं आहे.

कुत्रा मेल्याचं सांगत कचऱ्यासोबतच त्यांनी ट्विंकलच्या मृतदेहास जाळलं होतं.

कुत्रा मेल्याचं सांगत कचऱ्यासोबतच त्यांनी ट्विंकलच्या मृतदेहास जाळलं होतं.

पोलीस उप महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं की, बाणगंगा क्षेत्रात राहणाऱ्या ट्विंकल डागरे या 22 वर्षीय तरुणीची 2 वर्षांआधी हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणात भाजप नेता जगदीश करोतिया उर्फ कल्लू पहलवान, त्याची 3 मुलं आणि त्याचा मित्र नीलेश कश्यप यांना अटक करण्यात आली आहे.

जगदीश करोतिया हा आधीच विवाहित होता. पण तरीदेखील त्याने ट्विंकलसोबत अनैतिक संबंध ठेवले होते.

ट्विंकल भाजप नेत्यासोबत त्याच्या घरी राहत होती. त्यामुळे त्यांच्या घरात रोज भांडणं व्हायची.

मिश्रा म्हणाले की, 'रोजच्या भांडणामुळे वैतागलेले करोतिया आणि त्यांच्या मुलांनी ट्विंकलची हत्या करण्याचा कट रचला. त्यांनी 16 ऑक्टोबर 2016ला दोरखंडाने तिला गळफास दिला आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला'

ज्या ठिकाणी या तरुणीचा मृतदेह जाळला, त्या ठिकाणाहून पोलिसांनी तरुणीची जोडवी आणि ब्रेसलेट मिळालं आहे.

'हे हत्याकांड रचण्याआधी आरोपींनी दृश्यम या सिनेमा पाहिला होता. त्यामुळे त्यांनी या सिनेमातल्या एक सिनप्रमाणे कुत्र्याच्या मृतदेहाला एका जागेवर गाडलं आणि ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोहचवली की त्यांनी खड्ड्यामध्ये कुत्र्याचा मृतदेह गाडला आहे.' असं मिश्रा यांनी सांगितलं आहे.

जेव्हा पोलिसांनी या जागेला खोदलं. तेव्हा त्यातून कुत्र्याचे शव मिळाले. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वळण लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2019 01:35 PM IST

ताज्या बातम्या