घरातल्या महिलांवर मित्राची होती वाईट नजर, क्राईम पेट्रोल पाहून कायमचं संपवलं

घरातल्या महिलांवर मित्राची होती वाईट नजर, क्राईम पेट्रोल पाहून कायमचं संपवलं

एक ब्लाइंड हत्येचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपीने क्राईम पेट्रोल पाहून स्वत:च्याच मित्राच्या खूनाचा कट रचला. पण...

  • Share this:

उत्तर प्रदेश, 15 नोव्हेंबर : हत्येच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक ब्लाइंड हत्येचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपीने क्राईम पेट्रोल पाहून स्वत:च्याच मित्राच्या खूनाचा कट रचला. पण म्हणतात ना कायद्याचे हात लांब असतात. त्यातून सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लोणार पोलिसांच्या तावडीत मानवेन्द्रसिंग नावाचा तरुण चांगलाच अ़डकला आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव शिवम आहे. मानवेंद्र सांडी इथल्या पोलिस स्टेशनच्या पिंडारी गावचा गाव प्रमुख आहे. कोतवाली शहरातील रहिवासी शिवानंदन सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला 1 नोव्हेंबर रोजी अटक केली.

शिवनंदनचा मृतदेह 2 नोव्हेंबर रोजी सकाळी लोणार पोलिस ठाण्याच्या बावनस्ती शहराजवळ कालव्याच्या काठावर पडला होता. प्लास्टिकच्या टायने ठार मारल्यानंतर शिवानंदनचा मृतदेह फेकण्यात आला. पोलिस तपासात मृताच्या मोबाइलवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला असल्याचे आढळले, ज्यानंतर मृत तरुण गायब होता.

पोलिसांनी अज्ञात कॉलची माहिती काढून शोध सुरू केला. पोलिसांना समजले की आरोपीने प्री-अ‍ॅक्टिवेटेड सिम विकत घेतलं होतं आणि शिवानंदनला फक्त एकदाच फोन केला होता. त्यानंतर पोलिसांनी सिम विक्रेत्याचा शोध घेतला आणि मारेकरीपर्यंत पोहोचले.

पोलिसांनी आरोपी गावचा प्रमुख मानवेंद्र सिंह यांना अटक करताच त्याच्या मोबाईलचे ठिकाणही घटनास्थळावरुन बाहेर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची काटेकोरपणे चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीच्या म्हणण्यानुसार, शिवानंदन त्याच्या घरी यायचा आणि त्याचे वर्तन काही ठीक नसायचे. तो घरातील महिलांवर चुकीच्या नजरेने पाहायचा. त्यासाठी त्याने टीव्हीवर क्राइम पेट्रोल सीरियल पाहून शिवनंदनला ठार मारण्याचा प्लान केला. आधी त्याने एक नवीन सिम आणि मोबाईल फोन विकत घेतला आणि त्याला कॉल केला आणि नंतर मद्यपान करुन त्याला वॅगनआर कारमध्ये बसविलं. त्यानंतर शिवमने मागून प्लास्टिक टाईने त्याचा गळा आवळला.

शिवानंदनला ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह कालव्याजवळ फेकला गेला आणि तेथून पळ काढला. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनेत वापरलेली कार आणि प्लास्टिकची टाय जप्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या