Home /News /news /

युपी, बिहारनंतर आता कोकणातही स्पेशल ट्रेन सोडा, मनसे आमदाराची मागणी

युपी, बिहारनंतर आता कोकणातही स्पेशल ट्रेन सोडा, मनसे आमदाराची मागणी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, दिवा, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये अनेक कोकणवासीय नागरिक, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्या करिता सरकारने अद्याप कोणतीही रेल्वेच्या गाड्या सोडल्या नाहीत.

    डोंबिवली, 07 मे : गेल्या काही दिवसांपासून आपल्या गावी जाण्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि इतर ठिकाणच्या रेल्वे तर्फे गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, दिवा, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये अनेक कोकणवासीय नागरिक, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्या करिता सरकारने अद्याप कोणतीही रेल्वेच्या गाड्या सोडल्या नाहीत. हेच लक्षात येताच मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री, डीआरएम,रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना ट्विट केलं आहे आणि कोकणातील नागरिकांसाठी स्पेशल ट्रेन सोडाव्यात अशी मागणी ट्विटर द्वारे केली आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबईच्या आणखी एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार, कोरोना मृतदेहांची झाली अदलाबदल मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, दिवा, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये अनेक कोकणवासीय बांधव राहात आहेत. त्यांना कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन उपलब्ध करून दिल्यास बस वा इतर उपाययोजनांपेक्षा अधिक सोयीचे व सुरक्षित ठरेल.' तसंच मुबंई, ठाणे, दिवा आणि पनवेल या स्थानकातून गाड्या सोडाव्यात अशी मागणी सुद्धा केली आहे. यावेळी त्यांनी कोकण रेल्वेलासुद्धा टॅग करत मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री लक्ष देत आपल्याच मराठी माणसाची गावी जाण्यासाठी गाड्या सोडतील का हे पाहावं लागणार आहे. विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी 5 स्टार क्वारंटाईन कक्ष, पालिकेनं अशी केली तयारी
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या