'साथ जियेंगे और साथ मरेंगे'! पतीच्या निधनानंतर पत्नीनंही मृत्यूला कवटाळलं

'साथ जियेंगे और साथ मरेंगे'! पतीच्या निधनानंतर पत्नीनंही मृत्यूला कवटाळलं

बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारणमध्ये (Champaran) अशी एक खूपच दुःखद घटना घडली आहे. ज्यामध्ये पतिचा मृत्यू (Husband death) झाल्यानंतर काही वेळातचं पत्नीनंही (Wife dead) आपला प्राण त्याग केला आहे.

  • Share this:

पश्चिम चंपारण, 13 डिसेंबर: 'साथ जियेंगे और साथ मेरेंगे' हे वचन वास्तव ठरू शकतं, यावरही अनेकांचा विश्वास बसणार नाही. परंतू बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारणमध्ये (Champaran) अशी एक सत्य घटना घडली आहे. ज्यामध्ये पतीचा मृत्यू (Husband death) झाल्यानंतर काही वेळातचं पत्नीनंही (Wife dead) आपला प्राण त्याग केला आहे. बिहारमधील (Bihar) बगहा जिल्ह्यातील मधुबनी गावचे माजी प्रमुख विश्वनाथ सिंह यांचं अचानक निधन झालं. पतिच्या निधनाचा पत्नी हेमा सिंह यांना जबरदस्त धक्का बसला, या धक्क्यातून त्यांना सावरताच आलं नाही.

पतीच्या निधनाच्या काही काळानंतर हेमा सिंह यांनीही मृत्यूला कवटाळलं आहे. या घटनेमुळं सर्व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी या दोघांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार केले.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नीला जगायचं नव्हतं

गावचे माजी प्रमुख विश्वनाथ सिंह यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा सिंह खूपच खचून गेल्या होत्या. त्यांना क्षणभरसुद्धा एकटं राहवत नव्हतं. नवरा जग सोडून निघून गेला आणि आपण जिवंत आहोत याचं हेमाला दुःख होतं. याच धक्क्याच्या काही काळानंतर हेमा सिंह यांनीही मृत्यूला कवटाळलं.

अंत्ययात्रा आणि अत्यंसंस्कार एकत्रित झाले

मधुबनी गावचे माजी प्रमुख विश्वनाथ सिंह आणि त्यांची पत्नी हेमा सिंह यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांची अंत्ययात्रा काढली आणि एकत्रित अंत्यसंस्कार केले. बर्‍याचदा चित्रपटांत अशी दृश्ये पाहिली जातात. पण मधुबनी लोकांनी प्रत्यक्षात हा दुःखद अनुभव घेतला आहे. या घटनेमुळे सर्व गावभर हळहळ व्यक्त केली जात होती. अनेकांनी आपल्या दुःखाला अश्रुच्या रुपात मोकळी वाट करून दिली. पतीसोबतच पत्नी हेमा सिंहही गावच्या प्रमुख होत्या.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 10:00 PM IST

ताज्या बातम्या