Home /News /news /

सरांनंतर आता मॅडमचा Dance Video Viral; वर्गातच शिक्षकांनी घातला धुमाकूळ

सरांनंतर आता मॅडमचा Dance Video Viral; वर्गातच शिक्षकांनी घातला धुमाकूळ

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    आग्रा, 25 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका शिक्षकाचा डान्स व्हिडीओ व्हायरल (Teachers Dance Video Viral On Social Media) झाला होता. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती एका डान्स गर्लसोबत ठुमके लावत असल्याचं दिसत होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. शिक्षकच (School Teachers) असं वागत असतील तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यंदा हा व्हिडीओ सरांचा नसून मॅडमचा आहे. शाळेच्या वर्गामध्ये महिला शिक्षक ठुमके लावताना दिसत आहे. याचा व्हिडीओही त्यांनी शूट केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ही वाचा-महिला डान्सरसह शालेय शिक्षकाचे जोरदार ठुमके; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडीओ आग्रा येथील आहे. येथील एका शाळेत शिक्षकांची डान्स पार्टी सुरू होती. त्यावेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला. चित्रपटाच्या गाण्यावर मॅडम जोरदार डान्स करीत असताना दिसत आहे. मात्र शिक्षकांना हा डान्स महागात पडला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून डान्स पार्टीबाबत शाळेच्या व्यवस्थापनेकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. शाळेतील वर्गामध्ये डान्स पार्टी आयोजित करण्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. शिक्षणाच्या मंदिरात शिक्षकांनी ठुमके लावण्याच्या या व्हिडीओवरुन नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षकांकडून आलेलं स्पष्टीकरण न पटल्यास विभागीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा व्हिडीओ अछनेरा गावातील सांधन येथील प्राथमिक शाळेतील आहे. काही दिवसांपूर्वी विकासखंड घंसोरमधील गोरखपुर हायर सेकेंडरी शाळेचे शिक्षक रामवीर सिंह सिकरवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये शिक्षकाला सार्वजनिक ठिकाणी एका महिला डान्सरसह (women dancer) ठुमके लावताना पाहण्यात आलं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षक चर्चेत आला आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Dance video, Uttar pardesh, Viral video on social media, Viral video.

    पुढील बातम्या