Home /News /news /

हदयाचे ठोके बंद झाल्याचं समजताच डॉक्टरांनी तातडीने केली डिलिव्हरी, जन्माला आलं 2 डोकं असलेलं बाळ

हदयाचे ठोके बंद झाल्याचं समजताच डॉक्टरांनी तातडीने केली डिलिव्हरी, जन्माला आलं 2 डोकं असलेलं बाळ

महिलेची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले जाते. पण या घटनेमुळे आईला मोठा धक्का बसला आहे.

    छत्तीसगड, 23 एप्रिल : जिल्हा रुग्णालयात एका महिलेने 2 डोके असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. 22 एप्रिल रोजी डॉक्टरांनी त्या महिलेचे ऑपरेशन यशस्वीरित्या केले पण धक्कादायक बाब म्हणजे नवजात बाळाचा यामध्ये मृत्यू झाला. मुल गर्भाशयातच मरण पावल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सोनोग्राफी अहवालात याची पुष्टी झाल्यानंतर डॉक्टरांनी अचानक त्या महिलेचं ऑपरेशन केलं. महिलेची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले जाते. पण या घटनेमुळे आईला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकुमच्या आमटी या गावी राहणारी 24 वर्षीय महिलेला गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात त्रास असह्य झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता बाळाच्या हृदयाचा ठोका आढळला नाही. यानंतर यापूर्वी केलेल्या सोनोग्राफी अहवालाचीही चौकशी करण्यात आली. त्यामध्ये बाळ जुळे असल्याचं समोर आलं. ड्युटी डॉक्टर ममता पांडे यांनी तातडीने त्या महिलेचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. दोन डोके आणि एक धड असलेले बाळ डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला सीझरनंतर बाहेर काढण्यात आले. मुलाचे दोन डोके व धड पाहून डॉक्टरांच्या टीमला मोठा धक्का बसला. गर्भाशयातच मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिलं. यानंतर महिलेला प्रसूती सर्जिकल वॉर्ड हलविण्यात आला. प्रसूती झाल्यानंतर महिलेची स्थिती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरोग्याच्या कारणास्तव नुकताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Raipur news

    पुढील बातम्या