Home /News /news /

''दंगली करण्याचा प्रयत्न कोणी केला तर...'', राज ठाकरेंच्या सभेनंतर राज्य सरकारमधल्या मंत्र्याचा इशारा

''दंगली करण्याचा प्रयत्न कोणी केला तर...'', राज ठाकरेंच्या सभेनंतर राज्य सरकारमधल्या मंत्र्याचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS president Raj Thackeray) काल औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा पार पडली. राज ठाकरेंनी जवळपास एक तास भाषण केलं.

    मुंबई, 02 मे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS president Raj Thackeray) काल औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा पार पडली. राज ठाकरेंनी जवळपास एक तास भाषण केलं. या भाषणादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. तसंच राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या भाषणानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, असं म्हटलं. राज ठाकरेंचं हे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारनं गांभीर्यानं घेतलं आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावर इशारा देत म्हटलं की,राज्यात दंगे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कारवाई तितकीच कठोर असेल. मटानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. राज ठाकरे यांच्या सभेतल्या भाषणानंतर राज्यातल्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाल्याचंही माहिती समोर आली आहे. काय म्हणाले जयंत पाटील कुणी जर जनतेला होऊनच जाऊ द्या काय ते, अशा पद्धतीने दंगे करण्यासाठी चिथावणी देत असेल, तर जनतेनं विवेक जागा ठेवून विचार करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर महाविकास आघाडी सरकार आणि यंत्रणा कठोर कारवाईसाठी 24 तास सज्ज आहे. ही कारवाई कठोर म्हणजे नक्की काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची तीव्रता जितकी असेल, तितकीच कारवाई कठोर होईल, इतकेच या घडीला आपण सांगू शकतो. राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर गृहमंत्री वळसे पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया राज्यात भोंगे महत्वाचा नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय? असा परखड सवाल उपस्थितीत तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात सभा घेऊन 4 तारखेपासून भोंगे काढले नाहीतर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला आहे. त्यांच्या या सभेवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील खोडद येथील एका जाहीर कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली. 'राज्यात भोंग्यावरुन राजकारण केलं जातं आहे. भोंगा महत्वाचा नाही मात्र फक्त भोंग्यावरुन हिंन्दु मुस्लिम यांच्यामध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय होईल, असा प्रश्न उपस्थितीत करत वळसे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या