कर्नाटकमध्ये सरकार बनवलं तरी काँग्रेसचा मार्ग 'काटेरीच'!

कर्नाटकमध्ये सरकार बनवलं तरी काँग्रेसचा मार्ग 'काटेरीच'!

कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जेडिएसला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन झालं तरी काँग्रेससमोरचा मार्ग काटेरीच राहणार आहे.

  • Share this:

बंगळूरू,ता.15 मे: कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतानं हुलकावणी दिली. काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आल्यानं त्यांचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झालीय. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जेडिएसला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन झालं तरी काँग्रेससमोरचा मार्ग काटेरीच राहणार आहे.

कर्नाटकमधल्या निकालांनी आधीच जर्जर झालेल्या काँग्रेसला आणखी घायाळ केलं आहे. या वर्षाच्या शेवटी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणूका आहेत. या तीनही राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून ती सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावा लागणार आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचा मार्ग कठिण असणार आहे.

कर्नाटकात भाजपला फटका बसला असता तर आगामी तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम झाला असता. मात्र कर्नाटकच्या निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू आणि अमित शहांचं संघटनकौशल्य अजूनही काम करतं हे सिद्ध झालंय.

कर्नाटकमध्ये राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला आमंत्रित केलं तर भाजपला बहुमत जुळवण्यासाठी अनेक क्लुप्त्या कराव्या लगातील. त्यात ते यशस्वी झाले तर पुढच्या तीन राज्यांच्या निवडणूकीत त्याचा फायदा होऊ शकतो.

पहिल्या टप्प्यात वातावरण काँग्रेसच्या बाजुनं दिसत असलं तरी शेवटच्या टप्प्यात वारं फिरवण्याचं कसब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांमध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय तर काँग्रेसमध्ये असा करिष्मा असलेलं नेतृत्व नाही हे पु्न्हा एकदा अधोरेखित झालंय.

 

First published: May 15, 2018, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading