नराधमाने मित्रांसोबत केला गर्लफ्रेंडवर बलात्कार, नंतर आईच्या मदतीनेच जिवंत जाळलं

नराधमाने मित्रांसोबत केला गर्लफ्रेंडवर बलात्कार, नंतर आईच्या मदतीनेच जिवंत जाळलं

ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी 2 महिने मुलीला कैद करून ठेवण्यात आलं होतं. यावेळी पीडित तरुणीच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने वारंवार तिच्या सामूहिक बलात्कार केला

  • Share this:

नवी दिल्ली, 08 डिसेंबर : हैदराबाद (Hyderabad)आणि उन्नाव (Unnao) मध्ये तरुणींवर झालेला सामूहिक बलात्कार (Gang Rape)त्यानंतर जिंवत झाळल्याच्या घटनेनं आधीच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच आता त्रिपुरा(Tripura) मध्ये असाच बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका 17 वर्षीय मुलीवर तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. त्यानंतर सगळ्यात गंभीर म्हणजे प्रियकराने आईच्या मदतीने मुलीला जिवंत जाळलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी 2 महिने मुलीला कैद करून ठेवण्यात आलं होतं. यावेळी पीडित तरुणीच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने वारंवार तिच्या सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आईच्या मदतीने आरोपी मुलांनी तरुणीला जिवंत जाळलं. यामध्ये पीडित मुलगी 90 टक्के भाजली असल्याची माहिती आहे. घटनेनंतर पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, पैशांच्या मागणीसाठी पीडित मुलीला मागच्या दोन महिन्यांपासून कैद करून ठेवलं होतं. मुलीच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरताच रुग्णालयाच्या बाहेर लोकांनी गर्दी केली आणि आरोपी व त्याच्या आईवर हल्ला केला. आरोपी अजय रुद्रपालने मुलीला सोडण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीला सुखरुप सोडवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव सुरू होती पण फक्त 17 हजार रुपयेच ते मिळवू शकले. त्यामुळे रागत असलेल्या आरोपींनी पीडित तरुणीला जाळून तिची हत्या केली.

इतर बातम्या - महाराष्ट्राची लेक देशात झळकली, शेतकऱ्याची मुलगी NAVY परीक्षेत आली दुसरी!

या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी असलेल्या एसपी (दक्षिण त्रिपुरा) जल सिंह मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाला भेटली. दिवाळी दरम्यान आरोपी तरुण मुलीच्या घरी पोहोचला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला.

यानंतर ही मुलगी या युवकाकडे राहू लागली. यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने बंधक करून ठेवले आणि पैशाची मागणी करण्यास सुरवात केली, असा पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे. आरोपीने त्याच्या सहकाऱ्यांसह मुलीवर अनेकदा बलात्कार केला. मुलगी बेपत्ता होताच तिने तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पीडितेच्या आईने दिली आहे.

दोन महिन्यांपासून होत होता सामूहिक बलात्कार

या प्रकरणी त्वरित पोलिसांना कळविण्यात आले पण कारवाई झाली नाही, असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. जेव्हा कुटुंबियांनी रुग्णालयात मुलीला भेट दिली तेव्हा तिची प्रकृती खूपच वाईट होती. मुलीने मरण्यापूर्वी त्यांना सांगितले की दोन महिन्यांपासून तिच्यावर सामूहिक बलात्कार होत होता.

इतर बातम्या - फेसबुक, व्हॉटस्अँपमुळे संसारात दुरावा, 35 टक्के घरगुती भांडणं सोशल मीडियामुळेच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 12:06 PM IST

ताज्या बातम्या