Home /News /news /

महाभयंकर! गुलाबनंतर आता 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र आणि गुजरात किनाऱ्यांना IMD चं अलर्ट

महाभयंकर! गुलाबनंतर आता 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र आणि गुजरात किनाऱ्यांना IMD चं अलर्ट

शाहीन हे चक्रीवादळ गुलाबपेक्षा भयन्कर आणि तीव्र असणार आहे.

  मुंबई, 28 सप्टेंबर: गेल्या काही वर्षांपासून भारताच्या समुद्रकिनाऱ्यांना अनेक चक्रीवादळांनी (Cyclone in India) धडक दिली आहे. यातील काही चक्रीवादळं ही बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तर काही अरबी समुद्रातून (Cyclone in Arabian sea) आली आहेत. ज्या राज्यांना या चक्रीवादळांचा फटका बसला आहे अशा राज्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. नुकतंच बंगालच्या उपसागरात आलेल्या 'गुलाब' चक्रीवादळामुळे (Gulab cylone Affect) आंध्रप्रदेश ओडिशासह महाराष्ट्रालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यात आता एक संकट महाराष्ट्राकडे (Shahin Cyclone in Maharashtra) झेप घेऊ बघत आहे. गुलाबनंतर आता 'शाहीन' (Shahin Cyclone latest Updates) नावाचं चक्रीवादळ येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या भागांना धडक देणार अशा इशारा IMD नं दिला आहे. या संबंधीचं वृत्त टीव्ही नाईन हिंदीनं प्रकाशित केलं आहे. गुलाबपेक्षा भयंकर असेल शाहीन अरबी समुद्रात हे वादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाला 'शाहीन' असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव ओमान देशानं दिलं आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार ते 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. इथे आल्यावर ते आपला स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.  या वादळाच्या हालचालींवर IMD चं सतत लक्ष आहे. हे वाचा - Weather Alert: पुढील 48 तास राज्यात अतिवृष्टीचा धोका; पुण्यासह या जिल्हांना हवामान खात्याचा इशारा कुठे धडकणार शाहीन IMD नं दिलेल्या माहितीनुसार शाहीन हे चक्रीवादळ गुलाबपेक्षा भयन्कर आणि तीव्र असणार आहे. मात्र माहितीनुसार हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमी तटांवर न धडकता समुद्रातुनच ओमानच्या दिशेनं निघून जाणार आहे. मात्र याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पडणार आहे. या राज्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असणार आहे. गुलाबचा हाहाकार   बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'गुलाब' वादळानं फक्त ओडिशा आणि आंध्रप्रदेशमधेच नाहीतर छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधेही हाहाकार माजवला आहे. सध्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. इतकंच नाही तर दहा लोकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. हे वाचा - चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्यांना RED अलर्ट आज पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव  या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते  अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. तर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली ही तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Cyclone, Gujrat, Maharashtra

  पुढील बातम्या