अबब! हम दो हमारे...या लंकाबाई आहेत 21व्या वेळी गर्भवती

अबब! हम दो हमारे...या लंकाबाई आहेत 21व्या वेळी गर्भवती

या महिलेला आतापर्यंत 9 मुली आणि 2 मुले अशी आपत्य असून पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

बीड, 09 सप्टेंबर : जनजागृतीच्या नावाने गप्पा मारणारं आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागाचं पितळ बीड जिल्ह्यात उघडं पडलें आहे. भटक्या पालावर राहणारी एक महिला 11 मुलांना जन्म दिल्यानंतर आता 21 व्या वेळी गर्भवती राहिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडली आहे. त्यामुळे या महिलेचं समुपदेशन करण्यासाठी आरोग्य विभाग पालावर पोहचलं आहे. या महिलेला आतापर्यंत 9 मुली आणि 2 मुले अशी आपत्य असून पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रकारामुळे 'हम दो हमारे अकरा, आईच्या तब्यतीला खतरा' असं म्हणायची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील केसपुरी कॅम्प परिसरात पाल ठोकून राहणाऱ्या राजाभाऊ खरात यांच्या पत्नी लंकाबाई राजेभाऊ खरात या 38 वर्षीय महिलेच्या बाबतीत हे घडलं आहे. खरात कुटूंब हे मुळचं टाकरवण इथले रहिवासी आहेत.

गावात हाताला काम मिळत नाही म्हणून रोजगाराचं साधन नसल्याने केसापुरी कॅम्प इथे पाल ठोकून राहतात. याच ठिकाणी राजेभाऊ खरात हे गीत गायन करून उदरनिर्वाह करतात. लंकाबाई या भंगार वेचण्याचं काम करतात. अशिक्षित लंकाबाई यांची आत्तापर्यंत 21 बाळंतपणं झाली असं त्याचं म्हणणं आहे. तर शासकीय नोंदणीनुसार त्यांची 17 बाळंतपणं झाली असल्याची माहिती आहे. त्यांच्या काही बाळंपणाची नोंद झाली नसावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या - क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं चिरडलं!

सध्या लंकाबाई यांना 9 मुली आणि 2 मुले आहेत तर 5 मुलांचा जन्मानंतर विविध कारणांमुळे मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली आहे. आता लंकाबाई 21 व्या वेळी पुन्हा गरोदर राहिल्या आहेत. यामुळे कुटुंब कल्याणच्या नावाने जनजागृती करणारे गेले कुठे? हा खरा प्रश्न निर्माण होतं आहे. या प्रकारामुळे बीडच्या आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

इतर बातम्या - पुरोगामी महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना, 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा!

कुपोषित मुलासह ठोकली होती धूम

साधारण 2 वर्षापूर्वी लंकाबाई यांचा मुलगा कुपोषित असल्याचं समोर आलं होतं. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, कुणालाही कल्पना न देता ते पळून गेले होते. त्यानंतर 24 तासांनी या महिलेला पुन्हा शोधून आणत त्या कुपोषित मुलावर उपचार करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली होती.

इतर बातम्या - धक्कादायक! KISS करण्यासाठी विद्यार्थिनीने दिला नकार, मित्राने जीव घेऊन...

21 व्या वेळी गर्भवती असणाऱ्या महिलेचं समुपदेशन करून तिला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आलं आहे. सर्व तपासण्या करण्यात येत आहेत. सोनोग्राफी केली असता 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं दिसून आलं. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. सध्या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. तिला गर्भवती असताना घ्यावयाची काळजी आणि प्रसुतीदरम्यानची गुंतागुंत आणि काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांचं 'एकला चलो रे' काँग्रेसला धक्का देत केली 'ही' घोषणा

First published: September 9, 2019, 6:32 PM IST
Tags: beed news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading