उपचारानंतर मिळाला डिस्चार्ज, पण बाळाला जन्म देण्याआधीच गर्भवती महिलेचा झाला मृत्यू

उपचारानंतर मिळाला डिस्चार्ज, पण बाळाला जन्म देण्याआधीच गर्भवती महिलेचा झाला मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये कित्येक वर्षांपासून कुपोषित बालक आणि गर्भवती महिलांच्या मृत्यूची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत.

  • Share this:

अमरावती, 18 जून : देशात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये कित्येक वर्षांपासून कुपोषित बालक आणि गर्भवती महिलांच्या मृत्यूची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. परंतु अजूनसुद्धा प्रशासन यावर नियंत्रण आणू शकलं नाही. चिखलदरा तालुका वैद्यकिय सेवेअंतर्गत सलोना प्राथमीक आरोग्य केंद्राअंतर्गत बोराळा इथल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांगली सुभाष भुसुम ही 8 महिन्याची गर्भवती बोराळा उपकेंद्राअंतर्गत सदर्हु इथे उपचार घेत होती. स्थानिक वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीत गर्भवतीस देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा सुरू होत्या. 16 जुनला अचानक या महिलेची प्रकृती बिघडल्यानं तिला अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथेही तिच्यावर उपचार करण्यात आले.

'तो' अंतिम वर्ल्डकप सामना होता फिक्स; श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा दावा

दुसऱ्या दिवशी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. पण घरी पोहोचल्यानंतर अचानक गर्भवती मातेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण प्ररिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खरंतर, गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याची ही काही मेळघाटातली पहिली घटना नसून अशा अनेक गर्भवती मातेची मृत्यू परिसरामध्ये झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच महिलेचा मृतदेह शवविच्छदनासाठी घेऊन जाण्यात आला असून अद्याप मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण अशा वारंवार घडणाऱ्या घडनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनानं यावर गांभीर्याने विचार करणं महत्त्वाचं आहे.

घरातून वेगाने पसरतो कोरोना, जाणून घ्या का आणि कसा?

संपादन - रेणुका धायबर

First published: June 18, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या