मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Mysterious brain disease : झोप लागताच दिसतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात रहस्यमयी आजाराची दहशत

Mysterious brain disease : झोप लागताच दिसतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात रहस्यमयी आजाराची दहशत

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

या रहस्यमयी आजाराने (Mysterious brain disease) सर्वांची झोप उडवली आहे.

उटावा, 07 जून:  संपूर्ण जग एकिकडे कोरोनाव्हायरशी (Coronavirus) लढतं आहे. त्यात आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis), फंगसचे (Fungus) आजार. या सर्वांना सामोरं जात असताना आता आणखी एका रहस्यमयी आजाराने चिंता वाढवली आहे. मेंदूसंबंधी एका विचित्र आजाराचे (Brain disease) अनेक रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना झोप लागत नाही आणि झोप लागली तरी  विचित्र स्वप्नं (Dream) पडत आहेत. स्वप्नामध्ये मृत लोक दिसत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार कॅनडामध्ये (Canada) मेंदूसंबंधी रहस्यमयी आजाराचे (Canada Mysterious brain disease) आतार्यंत 48 रुग्ण दिसून आले आहेत. या रुग्णांमध्ये निद्रानाश, अवयव शिथील होणं, भ्रम होणं अशी लक्षणं दिसत आहेत. या विचित्र आजारामुळे सर्वांनाच हैराण केलं आहे.

हा आजार कशामुळे होतो, कसा पसरतो, याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. काही लोकांच्या मते, खराब पर्यावरण, प्रदूषणामुळे हा आजार पसरत आहे. तर काहींच्या मते, मांसाहारामुळे हा आजार पसरत आहे. तर काही जणांनी याचा संबंध कोरोनाशी जोडला आहे.

हे वाचा - थरथर कापू लागले रुग्ण, ताप भरला; Black Fungus वरील औषधाचाच गंभीर दुष्परिणाम

पण फक्त कोरोनाच्या महासाथीनंतर नव्हे तर त्याआधीपासूनच असे काही रुग्ण दिसून आले होते. पण आता या रुग्णांची संख्या वाढते आहेत. या आजारामागे नेमकं कारण काय आहे, हे अद्यापही माहिती नाही. याचा शोध आता डॉक्टर आणि वैज्ञानिक घेत आहेत. पण तुमच्यात अशी काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

First published:

Tags: Canada, Health, Rare disease