तब्बल 12 वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलला शाहिद, ‘तिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्य ब्लॅक अँड व्हाइटसारखं झालं होतं.’

तुम्हाला माझ्या आयुष्यातील या काळाबद्दल नक्कीच माहीत असेल. फरक फक्त एवढाच होता की मी दाढी वाढवलेली नव्हती. त्यामुळे माझ्या मनात काय सुरू आहे हे कोणाला कळलं नव्हतं.

  • Share this:

शाहिद कपूरचा आगामी सिनेमा कबीर सिंगचा ट्रेलर काल १३ मे रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या काही तासांमध्ये हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या सिनेमात शाहिद यात प्रेमभंग झालेल्या कबीर सिंगची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. प्रेमभंगानंतर तो अँग्री यंग मॅन कसा होतो ते दाखवलं आहे.

शाहिदसोबत या सिनेमात कियारा आडवाणीचीही मुख्य भूमिका आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान शाहिदने त्याच्या ब्रेकअपचे अनुभव प्रसारमाध्यमांसमोर शेअर केले.

कबीर सिंग या व्यक्तिरेखेत शाहिद कसा गेला याबद्दल माहिती देत असताना, तुझं हृदय कधी तुटलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाला की, ‘तुम्हाला माझ्या आयुष्यातील या काळाबद्दल नक्कीच माहीत असेल. फरक फक्त एवढाच होता की मी दाढी वाढवलेली नव्हती. त्यामुळे माझ्या मनात काय सुरू आहे हे कोणाला कळलं नव्हतं.’

Loading...

शाहिद पुढे म्हणाला की, ‘मन तर सगळ्यांचंच दुखतं. फक्त कबीर सिंगच्या लेवलपर्यंत कोणी फारसं जात नाही. फार कमी लोकं आहेत जे असं करतात. याचमुळे अशी व्यक्तिरेखा पडद्यावर पाहायला लोक जास्त उत्सुक आहेत. जेव्हा तुमचा प्रेमभंग होतो तेव्हा तुम्हाला काहीच चांगलं वाटत नाही. असं वाटतं की सगळं ब्लॅक अँड व्हाइट सिनेमासारखं झालं आहे. आयुष्य बेरंग होऊन जातं. या सगळ्यातून बाहेर यावच लागतं.’

शाहिद कपूर आणि करिना कपूरचं अफेअर हे सर्वात चर्चिल्या गेलेल्या अफेअरपैकी एक होतं. २००४ मध्ये फिदा सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही. पण वैयक्तिक काही कारणांमुळे २००७ मध्ये दोघं वेगळे झाले.

दोघांचं ब्रेकअप झालं असलं तरी दोघांनी कामामध्ये आपलं खासगी आयुष्य कधी येऊ दिलं नाही. यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शाहिद म्हणाला होता की, ‘ब्रेकअपच्या वेळी 'जब वी मेट'चं प्रमोशन करणं सर्वात जास्त त्रास देणारं होतं. मला माझ्या मनातल्या भावना लपवून सिनेमासाठी काम करायचं होतं. मला कोणा एकाला निवडायचं होतं.’ कबीर सिंग सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर हा सिनेमा पुढच्या महिन्यात २१ तारखेला प्रदर्शित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...