कलम 370 रद्द केल्यामुळे सासू-सासऱ्यांशी संपर्क तुटला - उर्मिला मातोंडकर

कलम 370 रद्द केल्यामुळे सासू-सासऱ्यांशी संपर्क तुटला - उर्मिला मातोंडकर

तुमचं आणि काश्मीरचं नातं आहे. कलम 370 हटवण्याबाबत तुमचं काय मत आहे? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

  • Share this:

नांदेड, 31 ऑगस्ट : कलम 370 हटवण्याचा निर्णय अमानुषपणे घेतला असल्याची टीका काँग्रेसवासी झालेल्या सुप्रसिद्ध नायिका उर्मीला मातोंडकर यांनी केली आहे. बरं इतकंच नाही तर कलम 370 हटवल्यामुळे माझ्या सासू-सासऱ्यांशी माजा संपर्क तुटल्याचंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आयोजीत केलेल्या दहीहंडी महोत्सवाला हजेरी लवाण्यासाठी उर्मीला मातोंडकर आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.

तुमचं आणि काश्मीरचं नातं आहे. कलम 370 हटवण्याबाबत तुमचं काय मत आहे? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी 'माझा सासू-सासऱ्यांशी संपर्क तुटला आहे' असं उत्तर दिले. काश्मीरमध्ये जी परिस्थीती आहे ती दाखवली जात नाही. संपर्काची सर्व साधनं बंद करण्यात आली आहेत. गेल्या 22 दिवसांपासून सासू सास-यांसोबतही संपर्क झाला नसल्याचे उर्मीला म्हणाल्या.

सासू सास-यांना शूगर असल्याने त्यांना ईंसूलीनचे एंजेक्शन लागतात. पण, त्यांना ते मिळत आहेत की नाही याचीही माहिती होत नसल्याचं त्या म्हणाल्या. कलम 370 हटवल्याने विकास होत असेल तर त्याचं स्वागतही करते असेही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या - मंदिरात निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, ओळखीच्याच लोकांनी केले अत्याचार!

मोदी सरकारला झटका, कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बजावली नोटीस

जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात पाच सदस्यांचं खंडपीठ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करणार आहे. यासोबतच न्यायालयानं जम्मू-काश्मीरमधील मीडियाच्या स्वातंत्र्यासंदर्भातही केंद्रातील मोदी सरकारला नोटीस जारी केलं आहे. तसंच या नोटीशीला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत.

इतर बातम्या - बालकनीत रेलिंग पकडून योगा करत होती तरुणी, 80 फूट खाली कोसळली!

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या अशा 10 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर बुधवारी (28 ऑगस्ट) एकत्रित सुनावणी होणार होती. पण सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांचं खंडपीठ याचिकांवर आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणी करणार आहे.

मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन EXCLUSIVE VIDEO

First published: August 31, 2019, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading