S M L

मेघालयातून 'अफस्पा' हटवला,गृहमंत्रालयाचा महत्वाचा निर्णय

सुरक्षा दलांना विशेष अधिकार देणारा कायदा मेघालयातून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. गृहमंत्रालयानं सोमवारी एक पत्रक काढून याबाबतची सूचना दिली

Ajay Kautikwar | Updated On: Apr 25, 2018 04:27 PM IST

मेघालयातून 'अफस्पा' हटवला,गृहमंत्रालयाचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली,ता.23 एप्रिल: सुरक्षा दलांना विशेष अधिकार देणारा कायदा मेघालयातून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. गृहमंत्रालयानं सोमवारी एक पत्रक काढून याबाबतची सूचना दिली. 1 एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Armed Forces Special Powers Act (AFSPA) म्हणजेच 'अफस्पा' हा कायदा काश्मीर आणि पूर्वोत्तरातल्या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार सुरक्षा दलांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. या अधिकारांचा अतिरेक होतो आणि मानवाधिकारांचं उल्लंघन होतं त्यामुळं हा कायदा हटवावा अशी मागणी कायम होत असते. तर सुरक्षा दलांना अतिरेक्यांशी लढावं लागत असल्यामुळं या कायद्याची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जातो.

अरूणाचलमधल्या म्यानमारच्या सीमेजवळच्या तिरप, लोंगडिंग आणि चांगलाँग या तीन जिल्ह्यांमध्ये या कायद्याला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

या भागांमध्ये गेल्या चार वर्षात अतिरेकी कारवायांमध्ये 63 टक्क्यांची घट झालीय. तर 2017 मध्ये सुरक्षा दलांवरच्या हल्ल्यांमध्ये 40 टक्क्यांची घट झालीय.तर नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण 83 टक्क्यांनी कमी झालंय. त्रिपुरामध्ये हा कायदा 2015 मध्येच हटवण्यात आला आहे.

काय आहे 'अफस्पा'?

Loading...

  • दहशतवादग्रस्त आणि सीमावर्ती राज्यांमध्ये कायदा अस्तित्वात
  • वॉरंट नसताना चौकशीसाठी नागरिकांना अटक करण्याचा अधिकार
  • चौकशीसाठी अचानक घरांची तपासणी
  • संशयास्पद हालचाल आढळल्यास गोळी मारण्याचा अधिकार
  • सुरक्षादलावर कारवाईसाठी केंद्राची परवानगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 06:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close