देशाच्या प्रमुखाने खोटं बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना टोला

तप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतेही आकडे फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2018 08:46 AM IST

देशाच्या प्रमुखाने खोटं बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना टोला

गडचिरोली, 14 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतेही आकडे फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. पंतप्रधान आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटे बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या माणसात नसावी. देशाचा कुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय, अशा शब्दात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला. ते गडचिरोली येथील कात्रटवार भवनात वंचित आघाडीच्या वतीने आयोजित संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर उपराकार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे उपस्थित होते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला जाताना त्यांच्या विमानात कोण होत याचाही खुलासा नरेंद्र मोदी यांनी करावा. पंतप्रधान बाहेर देशात जातात, तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश असावा याची यादी पंतप्रधानांच्या संमतीशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे देशाला चुना लावून देश सोडून जाणारे लोकं त्यांच्या विमानात बसतातच कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये असा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

ही सगळी व्यवस्था ओरबडणारी आहे कारण गेल्या 70 वर्षात वंचितांना कोणीही स्विकारलं नाही त्यामुळे त्यांचं शिक्षणही झालं नाही. तसं झालं असतं तर सगळ्यांनी आरक्षण मागितलं नसतं असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 08:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close