सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिलीय. अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांनीच यासंबंधीची मागणी केली होती. त्यानंतर स्वतः उज्ज्वल निकम यांनीही होकर दर्शवल्यानंतर गृहखात्याकडून यासंबंधीची घोषणा करण्यात आलीय.

  • Share this:

19 नोव्हेंबर, सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिलीय. अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांनीच यासंबंधीची मागणी केली होती. त्यानंतर स्वतः उज्ज्वल निकम यांनीही होकर दर्शवल्यानंतर गृहखात्याकडून यासंबंधीची घोषणा करण्यात आलीय.

अनिकेतच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, आणि हा खटला कोपर्डी खटल्याप्रमाणेच जलदगतीने चालावा, यासाठीही सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. दरम्यान, अनिकेत कोथळे याला पोलीस कोठडीत मारहाण करतानाचं सीसीटीव्ही फुटेज डीलीट करणाऱ्या पोलिसांना सीआयडीने आज ताब्यात घेतलंय.

नेमकं काय आहे प्रकरण ?

अनिकेत कोथळेवर चोरीचा आरोप लावून पोलिसांनी गेल्या महिन्यात त्याला केली आणि कोठडीत त्याला जबर मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला गेला. मृतदेह जळत नाही हे पाहिल्यावर परत दुसऱ्यांदा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.

दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या अनिकेत कोथळे याच्याविरुद्ध लुबाडणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे सांगलीतील व्यापारी नीलेश खत्री यांचा हात आहे, असा आरोप अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने केला आहे. निलेश खत्रीला सीआयडी पोलिसांनी अटक केलीय. त्याला पोलीस कोठडीत मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 08:07 PM IST

ताज्या बातम्या