मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला अदनान सामीने दिलेल्या गिफ्टची किंमत ऐकाल तर...

मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला अदनान सामीने दिलेल्या गिफ्टची किंमत ऐकाल तर...

बॉलिवूडचे सेलिब्रिटी मुलांना कोणत्या गोष्टीची गरज पडण्याआधीच त्यांच्यासमोर जगभरातल्या महागड्या गोष्टी आणून ठेवतात.

  • Share this:

प्रत्येक आई- वडील आपल्या ऐपतीनुसार मुलांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या मुलाला कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवू नये यासाठी ते कितीही कष्ट करायला तयार असतात. पण या सगळ्यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी फारच पुढे असतात. ते मुलांना कोणत्या गोष्टीची गरज पडण्याआधीच त्यांच्यासमोर जगभरातल्या महागड्या गोष्टी आणून ठेवतात. आता लहान मुलाना महागड्या गोष्टी भेट देणाऱ्यांच्या यादीत गायक अदनान सामीही जाऊन बसला आहे.

सध्या अदनान सामी पत्नी आणि मुलीसोबत जर्मनीमध्ये सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहे. जर्मनीतच अदनानने मुलगी मेदिनाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी अदनानने मुलीला महागडी भेटवस्तूही दिली. अदनानने सोशल मीडियावर तिघांचा फोटो शेअर करत म्हटलं की, ‘माझी प्रेमळ रोया जान आणि परी मेदिनासोबत म्युनिक, जर्मनीतील कार्निवलमध्ये मस्ती करताना.’

Happy Mother's Day 2019: या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे आईसोबतचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?
 

View this post on Instagram
 

Medina’s Birthday gift... A special custom made stroller from ‘Aston Martin’... . . . #astonmartin #aston #car #cars #passion #gift #dolcegabbana #ralphlauren #polo #fendi


A post shared by Adnan Sami (@adnansamiworld) on

कधीही आई होणार नाही कविता कौशिक, जाणून घ्या कारण

अदनानने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला स्ट्रोलर भेट म्हणून दिलं. या स्ट्रोलरची किंमत आहे ४ हजार ५०० डॉलर. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत आहे ३ लाख १४ हजार रुपये. हे स्ट्रॉलर जगप्रसिद्ध ब्रिटीश ऑटोमोबाइल कंपनी एस्टन मार्टिनने तयार केलं आहे. अदनान म्हणाला की, त्याला मेदिनाला तिच्या दुसऱ्या वाढदिवसाला एक खास भेट द्यायची होती. तिच्यासाठी स्ट्रोलरहून उपयुक्त काय असणार म्हणून मी तिला स्ट्रोलर देण्याचं आधीच ठरवलं होतं.
लग्नाआधीच गरोदर राहिली अक्षय कुमारची 'हिरोईन'

मला स्वतःला महागड्या गाड्या विकत घ्यायला आवडतात. मी जेम्स बॉण्डचाही चाहता आहे. माझ्या मुव्ही कलेक्शनमध्ये जेम्स बॉण्डचे सर्व सिनेमे तुम्हाला दिसतील. मला मेदिनाला सर्वात सुंदर स्ट्रॉलर भेट म्हणून द्यायचे होते म्हणून मी एस्टन मार्टिनची निवड केली.

‘एस्टन मार्टिनच्या कारमध्ये ज्या पद्धतीचं लेदर वापरलं जातं. त्याचपद्धतीच्या लेदरचा उपयोग या स्ट्रोलरसाठीही केला आहे. यातल्या खास वैशिष्ट्यांमुळे ही सहजरित्या चालते. विशेष म्हणजे या स्ट्रोलरमध्ये एस्टन मार्टिनची खास चादर येते. ही चादर लोकरीपासून तयार केली जाते.’

VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: adnan sami
First Published: May 12, 2019 12:35 PM IST

ताज्या बातम्या