Home /News /news /

पाणी फाउंडेशन उपक्रमादरम्यान हिंसा, श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासींचा हल्ला

पाणी फाउंडेशन उपक्रमादरम्यान हिंसा, श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासींचा हल्ला

डोंगरावरील आदिवासी जमावाने हा हल्ला केला आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

    चांदवड, 3 मे : दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. डोंगरावरील आदिवासी जमावाने हा हल्ला केला आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. चांदवड तालुक्यातील मतेवाडी इथं श्रमदान करणाऱ्यांवर हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हल्ल्यात भाऊराव चव्हाण (वय 55), संतोष बबन मते (वय 29), सुरेखा दगु मते (वय 35)आणि मुन्ना शहा (पोकलंड चालक) यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी लोकांवर तर हल्ला केलाच शिवाज तेथील सहा ते सात मोटारसायकलही जाळून टाकल्या आहेत. तसंच पोकलंड मशीनच्या काचा फोडून नुकसान केलं आहे. हल्ला करणाऱ्या आदिवासींची संख्या जास्त असल्याने श्रमदान करणाऱ्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान, डोंगर उतारावर जमिनी कसणाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. पाणी फाउंडेशन उपक्रमाच्या अंतर्गत श्रमदान करणाऱ्यांवर हल्ल्या करण्यात आल्याची राज्यातील ही पहिली घटना मानली जात आहे. VIDEO : इमारतीच्या टोकावर उभा राहून घेत होता सेल्फी, अन्...
    First published:

    Tags: Adivasi, Chandvad, Drought, Pani foundation

    पुढील बातम्या