मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

EPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा

EPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा

तुम्ही EPFO ​​ने सुचवलेल्या काही स्टेफ्स फॉलो करून नॉमिनी जोडू शकता. ईपीएफओ खातेधारकांचा अकाली मृत्यू झाल्यास, केवळ नॉमिनीलाच ईपीएफ बचतीची रक्कम मिळू शकते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 डिसेंबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सर्व खातेदारांना 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनी जोडण्यास सांगितले आहे. जर खातेदाराने नॉमिनी जोडला नाही, तर त्याला ईपीएफओने दिलेले विविध फायद्यांपासून मुकावं लागू शकतं. तुम्ही अद्याप नॉमिनी जोडला नसेल, तर तुम्ही EPFO ​​ने सुचवलेल्या काही स्टेफ्स फॉलो करून नॉमिनी जोडू शकता.

ईपीएफओ खातेधारकांचा अकाली मृत्यू झाल्यास, केवळ नॉमिनीलाच ईपीएफ बचतीची रक्कम मिळू शकते. ईपीएफओमध्ये, खातेदार एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतो आणि जास्तीत जास्त टक्केवारीसाठी वेगवेगळे शेअर सेट करू शकतो.

नव्या वर्षात 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास लागणार शुल्क

दरम्यान,पेरोलच्या (Payroll) नवीन डेटानुसार, EPFO ​​ने ऑक्टोबरमध्ये 12.73 लाख निव्वळ ग्राहक जोडले आहेत, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 10.22 टक्के वाढ नोंदवली आहे. 20 डिसेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या EPFO ​​च्या तात्पुरत्या पेरोल डेटावरून (provisional payroll data) असे दिसून येते की EPFO ​​ने ऑक्टोबर 2021 मध्ये 12.73 लाख सदस्य जोडले आहेत," असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

नवीन वर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त, या राज्याच्या CMचं जनतेला मोठं गिफ्ट

नॉमिनी ऑनलाइन कसे जोडायचे?
>> EPFO वेबसाइट ओपन करा >> Service >> For Employee >> Member UAN/Online Service वर क्लिक करा.
>> UAN आणि Password ने लॉगिन करा.
>> Manage Tab मध्ये, E-Nomination वर क्लिक करा.
>> स्क्रीनवर Provide Detail टॅब उघडेल. Save वर क्लिक करा.
>> फॅमिली डिक्लेयरेशन अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा.
>> Add Family Details वर क्लिक करा (एकाहून अधिक नॉमिनी देखील जोडले जाऊ शकतात.
>> शेअरची रक्कम घोषित करण्यासाठी Nomination Details वर क्लिक करा. आता Save EPF Nomination वर क्लिक करा.
>> OTP मिळवण्यासाठी E-sign वर क्लिक करा. आधार लिंक केलेल्या मोबाईलवर OTP मिळवण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.

First published:

Tags: Epfo news, Pf