Home /News /news /

अदर पूनावालांची Emotional पोस्ट, वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाले...

अदर पूनावालांची Emotional पोस्ट, वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाले...

Cyrus Poonawalla

Cyrus Poonawalla

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांना पद्मभूषण (Padma Bhushan) या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटकाळातील काम आणि करोना प्रतिबंधक लस निर्मितीत योगदान दिल्याबद्दल पुनावाला यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 26 जानेवारी: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांना पद्मभूषण (Padma Bhushan) या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटकाळातील काम आणि करोना प्रतिबंधक लस निर्मितीत योगदान दिल्याबद्दल पुनावाला यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. पूनावाला यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा मुलगा अदर पूनावाला यांनी वडिलांसोबतचा आईच्या कुशीतील फोटो ट्विट भावनिक पोस्ट(Adar Poonwalla shares old family picture as father to be conferred with Padma Bhushan. See post )लिहिली आहे. सध्या त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 128 पद्म पुरस्कारांची घोषणा केली़ त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे. या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांचाही समावेश आहे. दरम्यान, पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजेच अदर पूनावाला यांनी स्वत:च्या बालपणीचा एक फोटो पोस्ट करत आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत. “मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली,” असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. या ट्विटसोबत अदर पूनावाला यांनी एक जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये अदर विलू सायरस पूनावाला यांच्या कुशीत दिसत आहेत. सर्वाना समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर सायरस पूनावाला यांनी, “देशाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या बरोबर पद्म किताबाचा मानकरी ठरणे हा माझा बहुमान आहे. भारत सरकारला मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. आरोग्य हा समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्वाना समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  एकूण 128 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, सोनू निगम, विजयकुमार डोंगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रभा अत्रे, राधेशाम खेमका (मरणोत्तर), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंग (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. या बरोबर, विजयकुमार डोंगरे, डॉ. हिम्मतराव बावस्कर, सुलोचना चव्हाण, सोनू निगम, अनिल राजवंशी, बालाजी तांबे (मरणोत्तर) आणि भिमसेन सिंगल यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या