बॉलिवूड अभिनेत्रीने साध्वी प्रज्ञावर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, ‘हाफिज सईद तर साधूच वाटत असेल?’

बॉलिवूड अभिनेत्रीने साध्वी प्रज्ञावर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, ‘हाफिज सईद तर साधूच वाटत असेल?’

'कितीही खालची पातळी गाठली तर तुम्ही आणि तुमच्या सतत द्वेष करणाऱ्या संघाच्या सहकाऱ्यां एवढी खालची पातळी गाठू शकत नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली, १८ एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या ट्रोलर्सना ट्विटरवर सडेतोड उत्तर देण्यासाठी ओळखली जाते. आता तिने साध्वी प्रज्ञाला भाजपकडून भोपाळ येथून निवडणूक लढवण्यावर कमेंट केली. तिच्या या कमेंटला अनेक उत्तर यायला लागली. ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वराने साध्वी प्रज्ञादेवीशी निगडीत अनेक ट्वीट केले. तिचं एक ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. यात साध्वी प्रज्ञा निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तसेच हाफिज सईदचा उल्लेखही या ट्वीटमध्ये केला आहे.साध्वीने भोपाळ येथून भाजपकडून निवडणूक लढवण्याचा उल्लेख केला. यावर बोलताना स्वरा म्हणाली की, ‘मध्य प्रदेशमधील उमेदवारांच्या यादीत अजून एक नाव आलं. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा... भाजपचा द्वेष आणि विभक्त करण्याचं राजकारणा पूर्णपणे समोर आलं आहे.’स्वरा भास्करच्या या ट्वीटवर शिवसेना नेते रमेश सोलंकीने तिच्यावर निशाणा साधत कन्हैय्या कुमारची आई अशी उपमा दिली. यावर बोलताना स्वरा म्हणाली की, ‘काका कितीही खालची पातळी गाठली तर तुम्ही आणि तुमच्या सतत द्वेष करणाऱ्या संघाच्या सहकाऱ्यां एवढी खालची पातळी गाठू शकत नाही. जर ही स्त्री तुम्हाला निर्दोष वाटत असेल तर हाफिज सईद तर संत वाटत असेल ना? माफ करा तो तर मुसलमान आहे.’ स्वराने रमेश यांना ट्विटरवर दिलेलं हे उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 04:00 PM IST

ताज्या बातम्या