'दिल तो हॅप्पी है' फेम अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

'दिल तो  हॅप्पी है' फेम अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

सेजल शर्माने दिल तो हॅप्पी है या मालिकेसह अभिनेते आमिर खान, क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जाहिरातींमध्ये काम केलं होतं.

  • Share this:

मिरा रोड, 24 जानेवारी : स्टार प्लस वाहिनीवरील 'दिल तो  हॅप्पी है 'या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्मा हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैराश्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

मुंबई उपनगरातील मिरा रोड पूर्व भागातील  शिवार गार्डन  परिसरात रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये गेल्या काही काळापासून सेजल शर्मा आपल्या मैत्रिणीसह वास्तव्य करत होती. भारतातील  प्रसिद्ध  स्टार प्लस टीव्ही चॅनेल  मधील  'दिल तो  हॅप्पी है' या मालिकेत तिने अभिनेत्री म्हणून अभिनय केला. ऑगस्ट  2019 पासून मालिका बंद झाली असल्यामुळे सेजल शर्मा कामाच्या शोधात होती.

'आपण गेल्या दीड महिन्यापासून  नैराश्यात असून  आत्महत्या करत आहोत, त्याकरिता कोणालाही  जबाबदार ठरवू नये' असं तिने सुसाईड नोटमध्ये  नमूद केलं आहे.

आज पहाटे चारच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.

मिरा रोड पोलिसांना  माहिती मिळताच  घटनास्थळी पोहचून  सेजलचा मृतदेह  ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कामाच्या निराशेने की अन्य काही कारणाने सेजलने आत्महत्या केली का? याचा शोध मीरा रोड पोलrस करत असल्याची माहिती वरिष्ठ  पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.

सेजल शर्माने दिल तो  हॅप्पी है या मालिकेसह अभिनेते आमिर खान, क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जाहिरातींमध्ये काम केलं होतं.

डिप्रेशनमुळे कुशाल पंजाबीनं केली होती आत्महत्या

मागील महिन्यात टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबीनं 27 डिसेंबरला आत्महत्या केली होती.कुशल पंजाबीनं 27 डिसेंबर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याची सुसाइड नोट मिळाली. ज्यात त्यानं माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं म्हटलं होतं तसेच त्याच्या एकूण संपत्ती पैकी 50 टक्के संपत्ती आई-वडीलांच्या नावे तर 50 टक्के संपत्ती 3 वर्षीय मुलगा कियानच्या नावे केल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याच्या जवळच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार कुशल आणि त्याच्या पत्नीमध्ये मागच्या काही काळापासून वाद सुरू होते आणि त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. त्यामुळे ती मुलाला घेऊन शंघाईमध्ये राहत होती.

त्याच्या अशाप्रकारे अचानक जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या निधनानंतर अनेक टीव्ही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही काही खुलासे केले. कुशल पंजाबीनं मानसिक आणि आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे म्हटले जात असले तरी जवळपास सर्वांनीच कुशलच्या आत्महत्येला त्याच्या पत्नीला जबाबदार ठरवलं होते.

First published: January 24, 2020, 11:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या