...म्हणून चक्क 6 वर्षांच्या मुलीच्या पाया पडल्या रेखा

...म्हणून चक्क 6 वर्षांच्या मुलीच्या पाया पडल्या रेखा

तिच्या या विनंतीवर रेखा स्टेजवर गेल्या आणि त्यांनी डान्स सुरू करण्यापूर्वी चक्क रुप्साचे पाय धरले.

  • Share this:

मुंबई, 26 मे- छोट्या पडद्यावरील सुपर डान्सर हा रिअलिटी शो अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. आवर्जुन पाहण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात यावेळी विशेष पाहुणी म्हणून बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आल्या होत्या. या शोमध्ये एकाहून एक सरस हरहुन्नरी स्पर्धक आहेत. असा एकही स्पर्धक नसेल की ज्यातली एकही क्वालिटी तुम्हाला आवडणार नाही. प्रत्येकवेळी प्रेक्षकांना नवनवीन गोष्टी या स्पर्धकांच्या पाहायला मिळत असतात. यावेळीही काहीसं असंच झालं.

या आठवड्याची थीम होती ‘जश्न-ए-रेखा’. २५ मेच्या भागात रेखा या पाहुण्या प्रशिक्षक म्हणून आल्या होत्या. लहान मुलांचं कौशल्य पाहून रेखा या त्यांचं कौतुक करून थकत नव्हत्या. एका स्पर्धकावर तर त्यांचा जीव जडला. रेखा यांनी त्या स्पर्धकाला फक्त भेटवस्तूच दिली नाही तर स्टेजवर जाऊन तिच्या पायाही पडल्या.

सोशल मीडियावर आपल्या या एक्स गर्लफ्रेंडला फॉलो करतो रणबीर कपूरप्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

ही स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून लिटिल एंजल रुप्सा होती. रुप्साने 'सुहाग' सिनेमातील 'हे नाम रे' या गाण्यावर परफॉर्म केलं. रुप्सीचा तो परफॉर्मन्स रेखा मंत्रमुग्ध होऊन पाहत होत्या. रुप्साच्या डान्सचं कौतुक करताना तिच्यात रेखा यांना दुर्गेचं रुप दिसलं असं त्यांनी सांगितलं. रुप्साच्या परफॉर्मन्सवर खूश होऊन रेखा यांनी तिला एक बाहुली भेट म्हणून दिली. यावर रुप्सा म्हणाली की, ‘रेखाजी तुम्ही मला एक्सप्रेशन शिकवू शकता का?’ रुप्साच्या या विनंतीवर रेखा स्टेजवर गेल्या आणि त्यांनी डान्स सुरू करण्यापूर्वी चक्क रुप्साचे पाय धरले. यानंतर रुप्सानेही रेखा यांचे आशीर्वाद घेतले.

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

रुप्सा सहा वर्षांची आहे आणि ती स्पर्धकांमध्ये सर्वात लहान आहे. तिचं नृत्य कौशल्य एवढं भन्नाट आहे की, या शोमध्ये सर्वाधिक मतं तिलाच मिळतात. मुळची कोलकताची असणारी रुप्सा या शोसाठी आईसोबत खास मुंबईत आली आहे.

Bharat Dairies- कतरिना कैफचं हे हॉट साडी फॅशन स्टेटमेंट तुम्हीही करू शकता फॉलो

मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rekha
First Published: May 26, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading