अमृताच्या या सुंदर नृत्याला चागंला प्रतिसादही मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी अमृताचं कौतुक करत कमेंट्स केल्या आहेत. यात अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak), मंजीरी ओक, अबिगेल पांडे, सरगून मेहता यांसह अनेकांनी अमृताचं कौतुक केलं आहे. तिच्या अनेक चाहतेही तिचं सुंदर नृत्य पाहून भारावून गेले आहेत.View this post on Instagram
'सत्यनारायण की कथा'च नाही तर या सिनेमांचीही बदलावी लागली नावं; पाहा कोणते होते हे चित्रपट
अमृताने मागील आठवड्यातही असाच एक सुंदर परफॉर्मन्स नटरंग या गाण्यावर सादर केला होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे अमृताने पुन्हा एकदा तिचं नृत्य कौशल्य दाखवलं आहे.अमृता आणि तिचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra) यांना ‘नचबलिये’ (Nachbaliye) या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. आणि त्यांनी तो सिझन देखील जिंकला होता. त्यामुळे अभिनयासोबतच अमृता ही उत्कृष्ट डान्सर आहे. अमृता लवकरच ‘देजा वू’ या चित्रपटात अभिनेता शरद केळकर सोबत दिसणार आहे. याशिवाय ती नुकतीच वेलडन बेबी या वेब सीरिजमध्येही दिसली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.